आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आयपॅडलाच बनवा ड्रॉईंग बोर्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपॅडवर चित्र काढण्यासाठी आता खास पेन बाजारात आले आहेत. याच बरोबर दोनपेक्षा जास्त डिव्हाइसना ब्लूटूथद्वारे कनेक्ट करणारे स्पीकर्स लॉन्च झाले आहे.


वॅकम इनट्यूअस
किंमत - 6475

आयपॅडसाठी वॅकमनने प्रेशर सेंसिटिव्ह पेन तयार केले आहे. या पेनने तुम्ही तुमच्या आयपॅडवर चित्र काढू शकता, रंग भरू शकता किंवा एखाद्याचे स्केच बनवू शकता. हे पेन पाम रिजेक्शन तंत्रज्ञानाने तयार केले आहे. या पेनने आगदी हाळूवारपणे तुम्ही आयपॅडवर चित्र रेखाटू शकता. या पेनचा लुक स्लिम आहे. याची बॉडी अ‍ॅल्युमिनीअमने बनलेली असल्याने हा पेन पकडणे सोपे जाते.


हा आकर्षक पेन काळ्या रंगाच्या बॉक्समध्ये तुम्हाला मिळतो सोबतच पेनाचे टोक, रिग्जं आणि बॅटरी देखील मिळते. कनेक्टीव्हीटीसाठी यात चार ब्लूटूथ देण्यात आलेले आहेत. या पेनची प्रेशर सेंसिटिव्ह लेवल केवळ 2048 आहे. हा पेन तुम्ही आयपॅड, मिनी आयपॅड, आयपॅड3 आयपॅड4 सोबत कनेक्ट करू शकता. यात काही शॉर्ट कट बटणही आहेत. याच्या निबचा(टोकाचा) व्यास 6 एमएम आहे.

क्रियेटीव्ह टी- 4 वायरसेल
किंमत - 29,999
क्रियेटीव्ह कंपनी कॅम्प्युटर अ‍ॅक्सेसरीजसाठी जगप्रसिद्ध आहे. या कंपनीचे स्पीकर्स आणि हेडफोन्स तरूणांमध्ये लोकप्रिय आहेत. कंपनीने नुकताच लॉन्च केलेला टी- 4 वायरलेस स्पीकर सिस्टम जबरदस्त आहे. यात एनएफसी आणि ऑडीओ फाइल ग्रेड अ‍ॅल्युमिनीअम ड्राइव्हर्स वापरण्यात आले आहेत. याच्या हाय पर्फोमन्स स्लॅम सबवूफरने डीप आणि बास साउंड मिळतो. यात दोन ब्लूटूथ सहज कनेक्ट करता येतात. याच्या जबरदस्त साउंड क्वालिटीमुळे आणि साउंडकार्डमुळे सध्या हा स्पीकर चांगलाच चर्चेत आहे. या स्पीकरचा लुक काही खास नाही. याचे वॉल्यूम डाइल ऑपरेट करणे थोडे अवघड आहे.