आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Android Game Launched By India based Company ‎

अँड्रॉइड मोबाइलधारकांसाठी नवा गेम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - अँड्रॉइड मोबाइलधारकांसाठी ‘द डार्क मॅन’ हा नवा गेम उपलब्ध केल्याची घोषणा सेव्हन सीज एंटरटेनमेंट लि. या कंपनीने केली आहे. या गेमची ऑनलाइन आवृत्ती अत्यंत लोकप्रिय झाली असून गेल्या वर्षभरात सोशल नेटवर्किंग साइटसह इंटरनेटवर 15 दशलक्ष लोक हा गेम खेळत असल्याचे दिसून आले, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मारुती शंकर यांनी दिली. हा गेम गुगलच्या अँड्रॉइड मार्केटप्लेसवरून सध्या डाऊनलोड करता येतो. तसेच सॅमसंग अँप-स्टोअर, एलजी स्टोअर, सर्व अँड्रॉइड सपोर्टिंग अँप्लिकेशन स्टोअर आणि वितरकांच्या जाळ्यामार्फत येत्या काही दिवसांत उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली.