आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New App Stops Girlfriends From Feeling Neglected

आता गर्लफ्रेंड तुमच्यावर होणार नाही नाराज: पाठवा \'आय लव्ह यू\' मेसेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला गर्लफ्रेड आहे आणि तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करतात. मात्र, तरीदेखील ती तुमच्यावर नेहमी नाराज असते. कारण एकच की, तिला हवा तेवढा वेळ देऊ शकत नाही. म्हणून ती रागावलेली असते. जगातील सगळ्या प्रेमी युगुलांच्या भांडणामागील हेच एकमेव कारण असते.

आजच्या धावत्या जगात वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे वेळा पाळण्यासाठी आपल्याला तारेवरची कसरत करावी लागते. तरीदेखील आपण आपल्या गर्लफ्रेडपर्यंत वेळेत पोहोचू शकत नाही. परंतु आता चिंता सोडा. 'ब्रो अॅप' तुमच्यासाठीच आहे असे समजा. नव्या अॅपच्या माध्यमातून तुम्ही नेहमी आपल्या गर्लफ्रेडच्या जवळपासच आहात, याची तिला जाणीव करून देवू शकतात.

ऑस्ट्रेलियन तरुणांनी तयार केलेल्या या अॅपमध्ये सर्व प्री-प्रोग्राम आहे. या माध्यमातून खास प्रसंगी आपल्या गर्लफ्रेडला आपोआप टेक्ट्स मेसेज पाठवला जातो.

अॅप निर्माता टॉम आणि जेम्स यांच्यानुसार, आळस हा व्यक्तीचा शत्रू आहे. परंतु प्रेमात प्रेयसीला वेळ देण्यात कोणताही व्यक्ती आळस करत नाही. त्यामुळे हा अॅप व्यक्तीमधील आळस लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला नाही. तर बॉयफ्रेड आपल्या कामात व्यस्त असताना गर्लफ्रेंडची जास्तीत जास्त काळजी घेत आहे आणि त्याचे तिच्यावर निस्सिम प्रेम आहे, याची जाणीव तिला करून देण्यासाठी हा अॅप तयार करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे टॉम आणि जेम्स यांनी आपले प्रॉडक्ट ऑफिशियल लॉन्च करण्‍यापूर्वी तब्बल तीन महिने आपापल्या गर्लफ्रेंड्‍सवर 'टेस्ट' केला. अॅप वापर करण्यासाठी 'डेमो ब्रो अॅप'ही तयार केला आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर आपल्या गर्लफ्रेंड्सला दररोज एक मेसेज पाठवू शकतो. हे मेसेज गर्लफ्रेंडला खूप आवडतात.

पुढील स्लाइडवर वाचा, अॅपमधील सेफ्टी फीचर्स...