आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine\'s reminder: हे अ‍ॅप सांगेल कधी करायचा पार्टनला मॅसेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हेलेंटाइन डे अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. व्हेलेंटाइनडेला आपल्या पार्टनला इंप्रेस करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धती शोधत असतात. आता काळजी करण्याची गरज नाही आम्ही तुमच्यासठी आज व्हेलेंटाइन डे स्पेशल अ‍ॅप घेऊन आलो आहोत. Valentine's reminder हे अ‍ॅप तुमच्या पार्टनला रोमँटिक मॅसेज करण्यासाठी आठवण करून देईल.
हे अ‍ॅप सॉफ्टवेर डेव्हलपर ग्रेग नॉस (Greg Knauss) याने तयार केले आहे. त्याच्या लग्नाच्या 18व्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या पत्नीला रोमांटिक मॅसेज करण्याचे तो विसरला होता तेव्हा असे अ‍ॅप तयार करण्याची कल्पना त्याला सुचली.
कित्येकवेळा आपला स्मार्टफोन आपल्या जवळ असतो तरी आपण मॅसेज करायचे विसरतो. हे अ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या पार्टनचे नाव आणि नंबर टाकावा लागेल. याचबरोबर तुम्हाला कधी आणि किती वेळाने नोटिफिकेशन हवे आहे तेही सेट करावे लागेल. असे करताच सेट केलेल्या वेळेला हे अ‍ॅप तुमच्या पार्टनला मॅसेज पाठवेल.