आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नजरा नवीन बँक परवान्याकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नवीन बॅँक परवान्यासाठी आलेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या बिमल जालान समितीने आपला अहवाल रिझर्व्ह बॅँकेला सादर केला आहे. यामध्ये बॅँक परवान्यासाठी निवड झालेल्या कंपन्यांचा समावेश आहे.

चार ते पाच तास झालेल्या बैठकीनंतर जालान समितीने नवीन बॅँक परवाना अहवाल सादर केला असल्याचे रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर जालान यांनी सांगितले.

या अहवालामध्ये बॅँक परवाना प्राप्त करण्यासाठी पात्र ठरलेल्या कंपन्यांची नावे आहेत. परंतु या उच्चस्तरीय समितीने किती अर्जदारांची निवड केली हे तातडीने समजू शकलेले नाही. एक नोव्हेंबरला झालेल्या समितीच्या पहिल्या बैठकीनंतर या अर्जांच्या छाननीला सुरुवात झाली.

नवीन खासगी बॅँक स्थापन करण्याबाबत गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत मार्गदर्शकतत्त्वे जाहीर करण्यात आली. बॅँक परवान्यासाठी अर्ज करण्याची एक जुलै ही अंतिम मुदत होती.

सद्य:स्थिती काय :
रिझर्व्ह बॅँकेकडे आलेले अर्ज : 27 ; माघार घेतलेले : टाटा सन्स लि., व्हॅल्यू इंडस्ट्रीज
बॅँक स्थापन करण्यास इच्छुक :
इंडियन पोस्ट, आयएफसीआय, अनिल अंबानी समूह, आदित्य बिर्ला समूह, बजाज फायनान्स, मुथुट फायनान्स, रेलिगेअर एन्टरप्राईझेस.