भारतात आजपासून ११ हजारात मिळणार ब्लॅकबेरी स्मार्ट फोन

वृत्तसंस्था

Apr 19,2012 12:55:48 PM IST

नवी दिल्ली- रिसर्च इन मोशन (रिम) ने नवा ब्लॅकबेरी स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीने हे मॉडेल 'मोस्ट अफोर्डेबल' असल्याचे म्हटले आहे. कंपनीने दावा केला आहे की, ब्लॅकबेरी कर्व ९२२० या नव्या स्मार्टफोनची बॅटरी इतर दुस-या ब्लॅकबेरी कर्व स्मार्टफोनपेक्षा चांगली आहे.
क्वर्टी कीपॅड असणा-या या स्मार्टफोन ब्लॅकबेरीची किंमत कंपनीने १० हजार ९९० रुपये एवढी ठेवली आहे. बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ हिने समारंभात या शानदार फोनचे लॉंचिंग केले. दोन मेगापिक्सल कॅमे-याच्या या फोनचे 320X240चे पिक्सल रिझोल्यूशन तर डिस्प्ले २.४४ इंचचा आहे. ब्लॅकबेरी मॅसेंजर (बीबीएम) असणारा हा फोन चार रंगात उपलब्ध करुन दिला आहे. हा १९ एप्रिलला भारतीय बाजारात विक्रीस खुला केला आहे.सॅमसंगचा गॅलक्सी एस-3 पुढील महिन्यातX
COMMENT