आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सची नव्या वर्षातील पहिली साप्ताहिक कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महागाईतील घसरणीने दिलेला दिलासा आणि व्याजदर कमी होण्याची आशा यामुळे बाजारात आलेल्या खरेदीच्या उत्साहात सेन्सेक्सने नवीन वर्षात पहिल्यांदाच साप्ताहिक कमाई केली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या घसरणीला लगाम बसून सेन्सेक्स 305 अंकांनी वाढून 21 हजारांच्या वरच्या पातळीवर बंद झाला.
व्याजदर कमी होण्याच्या आशेबरोबरच विदेशी निधीचा ओघही नव्याने बाजारात येऊ लागल्यामुळे गुंतवणूकदारांच्या उत्साहात आणखी भर पडली. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी या आठवड्यात 1,577.97 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केल्याचे ‘सेबी’ची आकडेवारी सांगते.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी जाहीर झालेल्या अमेरिकेतील रोजगारविषक आकडेवारी अंदाजापेक्षा कमी असल्यामुळे जगभरातील सर्वच शेअर बाजारांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. फेडरल रिझर्व्ह बँक आपला महिन्याचा रोखे खरेदी कार्यक्रम आवरता घेण्यासाठी जास्त वेग देणार नाही, अशी अपेक्षाही आता गुंतवणूकदारांना वाटू लागली आहे. त्यातच महागाई डिसेंबरमध्ये 6.16 टक्के अशा पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्यामुळे बाजारात खरेदीचा उत्साह आणखी दुणावला. त्यामुळे भांडवली वस्तू, रिफायनरी आणि बॅँकांच्या समभागांना चांगली मागणी आली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक साप्ताहिक आधारावर भक्कम पातळीवर उघडून नंतर त्याने 21,379.29 अंकांची कमाल पातळी गाठली. 9 डिसेंबर कामकाजाच्या मधल्या सत्रात सेन्सेक्सने कमाल पातळी गाठण्याची ही दुसरी वेळ आहे. नंतर ही पातळी काहीशी घसरली तरी दिवसअखेर सेन्सेक्स 305.13 अंकांनी वाढून 21,063.62 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या दोन आठवड्यांत सेन्सेक्स 435.09 अंकांनी घसरला होता.
0टॉप लुझर्स : कोल इंडिया, टीसीएस, सन फार्मा, टाटा पॉवर, टाटा स्टील, अँक्सिस बँक.
0 टॉप गेनर्स : भेल, सिप्ला, एचडीएफसी, लार्सन अँड टुब्रो. रिलायन्स, एसएसएलटी, हीरो मोटोकॉर्प, हिंदुस्तान युनिलिव्हर, गेल इंडिया, बजाज ऑटो, ओएनजीसी, डॉ. रेड्डी लॅब, आयसीआयसीआय बँक.