चार तास अन् / चार तास अन् जग सामावणार मुठीत..

May 02,2012 02:40:42 AM IST

ब्रिटनच्या अभियंत्यांनी विमानासाठी एका अत्याधुनिक इंजिनाची चाचणी केली आहे. या इंजिनामुळे विमान जगातील कोणत्याही कोपर्‍यात फक्त चार तासांत पोहोचू शकेल, असा दावा अभियंत्यांनी केला आहे. प्रस्तावित स्कायक्लोन साधारण विमानासारखेच पारंपरिक रनवेवरून उड्डाण आणि लँडिंग करण्यात सक्षम ठरेल.
विमानाची निर्मिती करणारी कंपनी आईएलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले की, आम्ही जुलैत होणार्‍या फॉर्नबॉरो इंटरनॅशनल एअरशोमध्ये विमान सादर करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. ब्रिटन जेट इंजिनाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे असल्याचा संदेश यातून देण्यात येईल. या माध्यमातून फक्त चार तासांत जगातील कुठलाही कोपरा गाठता येईल.
इनोव्हेशन : सैबरे इंजिन
वैशिष्ट्य : कमी उंचीवरून जेट उड्डाण घेणार, वातावरण उंचीवर पोहोचल्यानंतर रॉकेटमध्ये रूपांतरित होणार

कुणाची निर्मिती : ऑक्सफोर्डशायरच्या रिअँक्शन इंजिन लिमिटेडने (आईएल) केले विकसित

आवश्यकता : 250 दशलक्ष पाउंड्सची गरज आहे या मोहिमेला फायनल टच देण्यासाठी

उड्डाणाचा पहिला टप्पा : स्पेशल प्री कूलर हीट एक्स्चेंजरचा वापर होतो. हे हायड्रोजन व ऑक्सिजनचे ज्वलन करते. कमी उंचीवर असताना वातावरणातून ऑक्सिजन शोषून घेते इंजिन

दुसरा टप्पा : लिक्विड हायड्रोजन आणि लिक्विड ऑक्सिजनचा होतो वापर. यामुळे विमान अवकाशातही प्रक्षेपित करता येऊ शकते.
फायदा - रॉकेटच्या बहु प्रणोदक यंत्रणेचा वापर करण्याची गरज पडणार नाही. त्याला थेट कक्षेतच स्थापन करता येऊ शकेल. गेल्या वर्षीच या प्रकल्पाचे स्वतंत्र ऑडिट करवून घेण्यात आले. युरोपीय अंतराळ संशोधन संस्था या इंजिनवर संशोधन करत आहे. मात्र त्याला शेवटचे रूप देण्याआधी त्याची एक छोटेखानी आवृत्ती तयार करण्याची इच्छा निर्माता कंपनीला आहे.
85 टक्के कर्जपुरवठा होत आहे खासगी क्षेत्रातून मात्र, पुढील टप्प्यासाठी सरकारी मदतीची मागणी होत आहे.

X