आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंत्रज्ञानाचा लाभ नकाशाच्या मदतीने शोधला जातो मुलांचा ठावठिकाणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुलं बाहेर आनंदात हुंदडत असली तरी आई - वडिलांना मात्र ती घरी कधी येतात याची सतत काळजी लागलेली असते. त्यातही आणखी उशीर झाला तर काळजाचा ठोका चुकतो. आपला मुलगा हरवला तर नाही ना, अशा एक ना अनेक शंकाकुशंकांचा फेरा मनात सुरू होतो. पण काळजी नका स्मार्टफोनवरील ‘फॅमिली ट्रॅकर’ अ‍ॅपने ही चिंता कायमची मिटवली आहे. हे आगळेवेगळे अ‍ॅप भारतात उपलब्ध नसले तरी परदेशात सध्या आहे. पण ते आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही हेही तितकेच खरे.
गेल्या वर्षी अ‍ॅटलांटामध्ये 14 वर्षांचा मुलगा संध्याकाळी घरी परतलाच नाही. बरीच प्रतीक्षा करून त्याच्या आईने अखेर मुलाचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी ‘फॅमिली ट्रॅकर’ अ‍ॅपवर क्लिक करून मुलाचा शोध घेतला.
फॅमिली ट्रॅकर अ‍ॅप हे पाल्याच्या चिंतेमुळे नेहमी त्रस्त असलेल्या पालकांसाठी देवदूतच म्हणायला हवे. कारण या अ‍ॅपच्या माध्यमातून एका नकाशाच्या मदतीने मुलांचा ठावठिकाणा शोधता येतो. इतकेच नाही तर शोध लागल्यावर अलार्मदेखील वाजतो. विशेष म्हणजे या अ‍ॅप्लिकेशनमध्ये सतर्क करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आहेत. हे अ‍ॅप्लिकेशन वापरण्यासाठी केवळ स्मार्टफोनच हवा असे नाही तर वेबवरदेखील ही सेवा उपलब्ध आहे. फॅमिली ट्रॅकरमध्ये अ‍ॅपकडून मिळालेली माहिती दोन आठवड्यांपर्यंत साठवून ठेवता येते. ‘जीपएस ब्रेडक्रम्ब’ असे या सेवेचे नाव आहे.
दोन आठवड्यांपासून तुमचा पाल्य कुठे होता किंवा कोणत्या विशिष्ट ठिकाणी आहे याची माहिती मिळू शकते, असे फॅमिली ट्रॅकरचे निर्माते रॉबर्टो फ्रान्सशेटी यांनी म्हटले आहे. तुमचा मुलगा वा मुलगी यांना फोन न करताही त्यांना बघू शकता. या अ‍ॅपमुळे तुमच्या मुलाचे अपहरण झाले किंवा गेल्या काही दिवसांमध्ये त्याने काय केले याची किमान माहिती मिळू शकेल. गेल्या वर्षी जपानमध्ये आलेल्या सुनामीच्या वेळी ‘लाइफ 360’ या अशाच प्रकारच्या एका अ‍ॅपची मदत झाली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser