आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Formula Of Government For Decrease Electricity Rate

विजेचा दर कमी करण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विजेचा दर कमी करण्याच्या उपाय योजनांचा एक भाग म्हणून विद्युत मंडळांवर असलेल्या कर्जाचे रूपांतर भागभांडवलात करून हा भार कमी करता येऊ शकेल का, यावर सरकार विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उत्पादन क्षमतेत वाढ करणे, विद्युत निर्मितीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार यंत्रणेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करीत आहे. वीज निर्मिती कंपन्यांच्या खांद्यावर कर्जाचा मोठा भार असून त्यामुळे खर्च कमी होत नसून पर्यायाने विजेचे दरही कमी होत नाहीयेत. हा कर्जाचा भार कमी करण्यासाठी आम्ही विविध पर्यायांचा विचार करीत असून त्यामध्ये कर्जाचे रूपांतर भागभांडवलात करणे हा एक उपाय होऊ शकतो, असा विचार मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखवला. महाराष्ट्र इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने (मायडा) आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र आर्थिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

राज्यातील विद्युत प्रकल्प सध्या पीक लोड फॅक्टरच्या जवळपास ५० टक्के प्रमाणात चालत असून इंधन उपलब्धता हाही एक प्रश्न असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, वीजनिर्मिती कंपन्यांनी प्रकल्पांना अर्थपुरवठा करण्यासाठी कर्जे घेतली आहेत, परंतु या कर्जाची रक्कम देणे त्यांना कठीण जात आहे. ऊर्जा क्षमतेची पातळीही लक्षणीय घसरली आहे. पण जर त्यांना भागभांडवल दिले तर कर्जाच्या व्याजाचा भार त्यांना सहन करावा लागणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.