आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - नव्या वस्त्रोद्योग धोरणामुळे महाराष्ट्रात 1331 नवे प्रकल्प आले आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री महंमद अरिफ नसीम खान यांनी सांगितले. खान यांनी सांगितले, आणखी काही प्रकल्प राज्याच्या उंबरठ्यावर आहेत. राज्यात दहा ठिकाणी टेक्सटाइल पार्क्सची उभारणी होत आहे. सरकारतर्फे त्यासाठी 51 कोटी रुपयांचे भांडवली, तर 16 कोटी रुपयांचे व्याज अनुदान देण्यात येणार आहे. तांत्रिक अद्ययावत निधी योजनेअंतर्गत (टीयूएफएस) येत्या पाच वर्षांत या क्षेत्रात 40 हजार रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जागतिक स्तरावर आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानाही गेल्या दीड वर्षात वस्त्रोद्योगात 12 हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टीयूएफएस योजनेमुळे गुंतवणूकदारांचा फायदा होणार आहे. या योजनेुनसारच राज्याने दीड वर्षापूर्वी नवे वस्त्रोद्योग धोरण राबवले होते. गुंतवणूकदाराला युनिक ओळख क्रमांकाची (यूआयडी) गरज भासणार नाही. टीयूएफएसअंतर्गत यूआयडी अनिवार्य असते. मात्र, राज्य सरकारने गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी थेट प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाडा, विदर्भाला लाभ
नव्या वस्त्रोद्योग धोरणाचा सर्वाधिक फायदा मराठवाडा आणि विदर्भ या कापूस पिकवणा-या विभागांना होणार आहे. या विभागात होणा-या स्पिनिंग मिल्स, गारमेंट, जिनिंग, प्रेसिंग आणि प्रक्रिया प्रकल्पातील गुंतवणुकीवर 7 टक्के व्याजआधारित अनुदान देण्यात येणार आहे. तांत्रिक वस्त्रोद्योग प्रकल्पासाठी सहा टक्के, तर काम्पोसिट प्रकल्पावर सहा टक्के अनुदान देण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.