आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Google Nexus Second Generation Launched In Us

गुगल हंगामा: जबरदस्‍त फीचर्सचा राजेशाही नेक्‍सस मिळणार कमी किंमतीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगलचा महत्‍वकांक्षी टॅब्‍लेट अखेर लॉंच झाला. या स्‍मार्टफोनने आधीपासूनच बाजारात धूम केली होती. आता हा नवा टॅब्‍लेट आल्‍याने टक्‍कर आणखी वाढणार आहे. गुगल नेक्‍सस 7 (फर्स्‍ट जनरेशन टॅब्‍लेट) गेल्‍यावर्षीच कंपनीने रिलीज केला होता. त्‍याशिवाय काल (बुधवार) कंपनीने सॅन फ्रॅन्सिस्‍कोमध्‍ये या नव्‍या नेक्‍ससवरील पडदा उठवला आहे.

ग्राहक या नव्‍या आणि जबरदस्‍त टॅब्‍लेटसाठी थोडे अधिक पैसे देण्‍यासाठी तयार होतील असा गुगलचा दावा आहे. नवीन नेक्‍सस 7 या श्रेणीतील एक शानदार टॅब्‍लेट आहे. विशेष म्‍हणजे याची किंमतही मिड रेंज टॅब्‍लेट इतकीच आहे. या टॅब्‍लेटच्‍या येण्‍याने अ‍ॅपल आणि अ‍ॅमेझॉनसारख्‍या कंपन्‍यांना मोठे नुकसान होण्‍याची शक्‍यता आहे. तंत्रज्ञानाच्‍या या युगातील ही उंदरा-मांजराची स्‍पर्धा खूपच रोमांचक होऊ शकते. त्‍याशिवाय बाजारात लॉंच होणारे नवीन टॅब्‍लेट ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. आता गुगलच्‍या या नव्‍या नेक्‍सस 7कडून मोठया अपेक्षा केल्‍या जात आहेत. divyamarathi.com तुम्‍हाला सांगणार आहे या टॅब्‍लेटच्‍या काही खास बाबी. कसा आहे गुगलचा नवा नेक्‍सस, काय आहे याची खासियत जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...