दमदार एचटीसी साल्सा! / दमदार एचटीसी साल्सा!

May 12,2012 03:15:33 PM IST

तैवानची कंपनी एचटीसीने मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपले दोन जबरदस्त फोन सादर करून खळबळ माजवून दिली. एचटीसीचा चा आणि एचटीसी साल्सा असे हे दोन मोबाइल फोन होते. दिसण्याच्या बाबतीत दोन्ही एकाहूनएक सरस आहेत. याद्वारे एचटीसी सॅमसंग, मोटोरोला आणि सॅमसंग आणि मोबाइल निर्माता कंपन्यांना मागे टाकू शकतो.

साल्साबाबत माहिती द्यायची झाल्यास हा एक टचस्क्रीन मोबाइल आहे. याचे वैशिष्ट्य असे की, याचे फेसबुक बटन दाबताच तुम्ही त्वरित फेसबुकच्या दुनियेत जाऊन पोहोचता. याच्या मागे 5 मेगापिक्सलचा कॅमेरा लावण्यात आलेला आहे. हा मोबाइल दिसण्यास सुंदर आहे, पण खालचा भाग प्लास्टिकचा असल्याने तो लोकांना खटकतो. साल्सा 800 मेगाहर्ट्झ प्रोसेसरमुळे चालतो. तो अँड्रॉइड फोनच्या तुलनेत बराच संथ आहे. यात कोणतीही ड्वेल कोअर चिप नाही. साल्सामध्ये अशी सुविधा आहे की, हा कोणत्याही प्रकारचे अँप्लिकेशन चालवण्यास सर्मथ आहे. तुम्ही याच्याकडून थ्रीडी ऑपरेशन अपेक्षित करत असाल तर हा संथ आहे. थोडक्यात, हा फोन सुंदरतेचे उत्तम उदाहरण आहे. वापरण्यास सोपा आहे. याचा 5 मेगापिक्सल कॅमेरा योग्य काम करतो. बंगळुरूमध्ये याची किंमत 18 हजार 796 रुपये इतकी आहे. फेसबुकचा सातत्याने वापर करणार्‍यांसाठी त्या मानाने कमीच आहे. याची अधिकृत किंमत 20 हजार 400 रुपये आहे.

X