खुषखबर! नवीन आयपॅडचे / खुषखबर! नवीन आयपॅडचे 27 एप्रिलला भारतात आगमन

Apr 17,2012 04:01:47 PM IST

नवी दिल्ली- ऍपल आयपॅडच्‍या चाहत्‍यांसाठी खुषखबर आहे. नवीन आयपॅड 27 एप्रिल रोजी भारतात उपलब्ध होणार असून, त्याची किंमत 30,500 रुपयांपासून पुढे राहणार आहे.
नवा आयपॅड काळा व पांढरा, अशा दोन रंगात उपलब्ध होणार आहे. त्‍यात वाय-फाय आणि वाय-फाय अधिक 4जी तंत्रज्ञान असलेली दोन मॉडेल्‍स आहेत. यातही 16, 32 आणि 64 जीबी अशी दोन व्‍हेरीयन्‍ट्स उपलब्‍ध राहणार आहेत. वाय-फाय सुविधा असलेला 16 जीबी क्षमतेचा आयपॅड 30500 रुपयांचा आहे. तर 32 आणि 64 जीबी क्षमतेच्‍या आयपॅडची किंमत अनुक्रमे 36,500 आणि 42,500 अशी ठेवली आहे. वाय-फाय अधिक 4 जी मॉडेल असलेला आयपॅड 38,900 रुपये (16 जीबी), 44,900 रुपये (32 जीबी) व 50,900 रुपये (64 जीबी) मध्ये उपलब्ध होणार आहे.
यापैकी 4जी एलटीई तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेला आयपॅड भारतातील 4जी नेटवर्कवर काम करु शकणार नाही. कारण हे तंत्रज्ञान भारतात उपलब्‍ध नाही.
नवीन आयपॅडमध्ये 2048 बाय 1536 पिक्सेल रिझोल्यूशन रेटिना डिस्प्ले असणार आहे. शिवाय ड्युअल कोअर ऍपल ए 5 एक्‍सचा प्रोसेसर, क्वाड कोअर ग्राफिक्‍स, 5 मेगा पिक्‍सेल कॅमेरा व 10 तास चालणारी बॅटरी अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत.
भारताबरोबरच कोलंबिया, एस्टोनिया, इस्राईल, लाटव्हिया, लिथुआनिआ, माँटेनीग्रो, दक्षिण आफ्रिका व थायलंडच्या बाजारपेठांमध्ये हा ऑयपॅड एकाच दिवशी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

X