आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदललेल्या इं‍टेरिअरसह मांझाचे नवे माडेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


टाटा ने 2009 मध्ये मांझा कार लाँच केली होती. इंटेरिअरला चांगलीच पसंती मिळालेली मिड-सलून सेगमेंटमधील ही पहिली कार होती. केबिनमध्ये मोकळी जागा हे त्याचे मुख्य कारण होते. मात्र, ही कार अपेक्षेनुसार ग्राहकांना आकर्षित करू शकलेली नाही. ही कार पुन्हा लाइमलाइटमध्ये आणण्यासाठी टाटाने मांझाचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे. या नव्या मॉडेलमध्ये अनेक नवी फीचर्स दिसून येतील. कारची दारे उघडताच छान मोकळी जागा दिसेल. मांझा ईएक्सएल मॉडेलमध्ये लेदर सीट बसवलेले आहेत. केबिनमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यामुळे कारला क्लासिक टच लाभला आहे. सेंटर कन्सोल पूर्णपणे बदलला आहे. ऑ डिओ सिस्टिमसाठी टचस्क्रीन इंटरफेसचा वापर झाला आहे. ब्ल्यूटूथ टेलिफोनी व सॅटेलाइट नेव्हिगेशनसारखी फीचर्स असलेली या सेगमेंटमधील ही पहिलीच कार आहे. यात सॅट-नॅव्ह फीचरही आहे. मात्र, त्यातून पॉइंट-टु-पॉइंट डायरेक्शनची माहिती मिळत नाही. मांझाच्या टॉप एक्सएल आणि ईएक्सएल मॉडेलच्या टॉपवर कलर काँट्रास्ट, म्हणजे ब्लॅक व सिल्व्हरचा वापर केला आहे. त्यामुळे ही कार इतर मॉडेल्सपेक्षा वेगळी दिसत आहे. चांगल्या केबिन क्वॉलिटीसाठी काळा रंग वापरला आहे. त्यातून कारला रॉयल टच मिळाला आहे.

बाहेरील लूक पूर्वीसारखाच...
नवे मॉडेल बाहेरून पाहिल्यास त्यात काही नवे बदल केले असतील असे वाटत नाही. जवळून पाहिल्यानंतर मात्र 8-स्पोक अ‍ॅलॉय व्हील आणि बॉडीच्या सजावटीत क्रोमचा वापर केलेला स्पष्टपणे दिसून येईल.
हाय पॉइंट
* केबिन बरीच मोठी आहे.गाडीत बसल्यानंतर छान वाटते
* काही वैशिष्‍ट्ये
लो पॉइंट
* ड्राइव्ह करण्‍याचा अनुभव विशेष नाही.
* केबिन क्व‍ालिटी अस्थिर आहे
किंमत- 5.7 - 8.8 लाख (एक्स शोरूम,दिल्ली)