(फोटो: Maruti Alto k10)
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी कार कंपनी 'मारुती सुझुकी'ने सोमवारी 'Alto k10' न्यू मॉडेल लॉन्च केले. Alto K10 हे एक ऑटोमॅटिक व्हर्जन असून या कारची किमत 3.80 लाख रुपये आहे. नॉन ऑटोमॅटिक व्हर्जनची किमत 3.06 लाखपासून 3.57 लाख रुपये दरम्यान आहे. सीएनजी मॉडेलची किमत 3.81 लाख रुपये आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये नवी Alto K10 24.07 किलोमीटर मायलेज देईल, असा दावा दावा मारुतीने केला आहे.
नवी Alto K10 ही जुन्या मॉडेलच्या तुलनेत 15 टक्के सरस आहे. सीएनजी मॉडेलचे मायलेज 32.36 km/kg सांगितले जात आहे. Alto K10 कारची बुकिंग सुरु झाली आहे. ग्राहक 10 हजार रुपये अॅडव्हॉस पेमेंट भरून कार बुक करू शकता.
पॉवरफूल इंजिन...
Alto K10 मध्ये एक लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. पाच स्पीड गिअर असल्याने ही कार कार कमाल 77.1 बीएचपीची पॉवर आणि 90Nm चा टॉर्क बनवते. मारुतीने
आपल्या सेलेरियो मॉडेलमध्ये दिलेले फीचर ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) पॉजिटिव्ह रिस्पॉन्सनंतर Alto K10 मध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. Alto ही मारुतीची यशस्वी मॉडेल आहे. आतापर्यंत एकूण 23 लाख Alto कारची विक्री झाल्याचे मारुती कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.
अन्य फीचर्स...
Alto K10 च्या फ्रंट प्रोफाइलमध्ये अपडेट करण्यात आले आहे. यात आधीच्या मॉडेलपेक्षा स्लिम ग्रिल, फ्रंट ग्रिलवर क्रोम स्ट्रिप, स्वेप्ट बॅक हेडलॅंप्स, बॉडी कलर हॅंडल्सचा वापर करण्यात आला आहे. इंटीरिअरमध्ये दोन रंगांचा वापर करण्यात आला आहे. तसेच स्टेअरिंग व्हिल देण्यात आले आहे. म्युझिक सिस्टम ग्लॉसी बॅक कलरमध्ये देण्यात आला आहे.
कारमध्ये न्यू डॅशबोर्डशिवाय कीलेस एंट्री सिस्टम, आतुन एडजस्ट होणार आउटर रिअर व्यू मिरर, गिअर शिफ्ट इंडिकेटर, की ऑफ रिमाइंडर आणि हेडलॅंप वॉर्निंग बजर सारखे फीचर्स देण्यात आले आहे. लेगरूमची साइज वाढवण्यात आली आहे. नवी Alto K10 जुन्या मॉडेलच्या तुलनेत 15 मीमी ऊंची आहे. त्यामुळे जास्त हेडरूम मिळाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, Alto K10 ची छायाचित्रे...