आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या एमसीएक्स शेअर बाजाराचे कामकाज सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - मुंबई तसेच राष्‍ट्रीय या सर्वात जुन्या शेअर बाजारांना टक्कर देण्यासाठी बाजारात उतरलेल्या ‘एमसीएक्स -एसएक्स’ या खासगी क्षेत्रातील नव्या शेअर बाजाराच्या औपचारिक कामकाजाला सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी या शेअर बाजारात केवळ 6.9 दशलक्ष रुपयांचे व्यवहार झाले.

एमसीएक्सच्या नव्या शेअर बाजाराचे उद्घाटन शनिवारी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते करण्यात आले होते. शेअर बाजारातील अनेक व्यवहार डिलिव्हरी बेस नाहीयेत, ते डिलिव्हरीवर आधारित करण्यासंबंधी सरकार विचार करीत असून पुढील पाऊल उचलण्यापूर्वी नियामक, शेअर बाजार कंपन्या आणि संबंधितांशी सरकार या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचे चिदंबरम यांनी या वेळी सांगितले.
‘एसएक्स 40’ या निर्देशांक गटात सध्या 40 कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे.