आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Mobile Application For Railway Station Information

रेल्वे प्रवासात स्टेशन सुटण्याचे टेन्शन संपले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर - रेल्वेतील प्रवासादरम्यान स्टेशन सुटण्याच्या टेन्शनपोटी आता झोपमोड करून घेण्याची गरज नाही. आपले स्टेशन येण्याआधीच 10, 15 व 20 किलोमीटरआधी त्याची सूचना देणारे अँड्रॉइड अ‍ॅप तयार झाले आहे.

या अ‍ॅपमध्ये विविध भागातील रेल्वेगाड्यांची माहिती फीड करण्यात आली आहे. हे अ‍ॅप जीपीएस सिस्टिमसारखेच काम करेल. मात्र ते सध्या अँड्रॉइड मोबाइलवरच उपलब्ध आहे. विशेष म्हणजे उशिरा येणार्‍या रेल्वेंचीही माहिती या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळेल.

डाऊनलोड करा अँप
आपल्या अँड्रॉइड मोबाइलच्या ‘प्ले स्टोअर’मध्ये जाऊन रेल अलार्म वा ‘कोलंबसअगेन’ हे की-वर्ड टाइप करा. स्क्रीनवर अ‍ॅप दिसल्यानंतर ते मोबाइलवर डाऊनलोड करा. प्रवासाच्या दिवशी अँप अँक्टिव्हेट करा.

..आणि सोबत ही माहिती मिळणार
कोणती रेल्वेगाडी कोणत्या स्टेशनवर किती वेळेत पोहोचेल, ही माहितीही हे अ‍ॅप देईल. इतकेच नव्हे तर कोणती रेल्वे सध्या कुठे आहे, ही माहितीही तुम्हाला अ‍ॅपमध्ये मिळेल. प्रवासादरम्यान पुढे कोणते स्थानक येणार आहे, याची माहितीही अ‍ॅपवर मिळेल.