आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New PAN Cards Issued By The Income Tax Department Will Cost Rs 105, Including Taxes

पॅनकार्ड बनवणे झाले कठीण; मोजावे लागतील 105 रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-आता पॅनकार्ड (पर्मनंट अकाउंट नंबर) बनविणे कठीण झाले आहे. प्राप्तीकर विभागाकडे पॅनकार्डसाठी अर्ज करताना आता ओळख, रहिवासी पत्ता आणि जन्मतारखेचा पुरावा असलेली मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावी लागणार आहेत. तसेच पॅनकार्डसाठी 85 रुपये शुल्क आणि सेवाकर असे 105 रुपये अर्जदाराकडून आकारले जाणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे.

नवा नियम येत्या 3 फेब्रुवारी 2014 पासून लागू करण्यात येणार आहे. पॅन कार्डचा वाढता वापर आणि त्याच होणार दुरुपयोगच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने नियमात बदल केले आहेत. पुराव्याची मूळ कागदपत्रे तपासली जातील. त्यांची पडताळणी झाल्यावर ती लगेच अर्जदाराला परत केली जातील.