आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Regulation For Insider Trading : SEBI Chairman Sinha

इनसायडर ट्रेडिंग रोखण्यासाठी नवी नियमावली : सेबी अध्‍यक्ष सिन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इनसायडर ट्रेडिंग रोखण्यासाठी लवकरच नवी नियमावली जाहीर होईल, असे मत भांडवल बाजार नियामक व नियंत्रक मंडळाचे (सेबी) अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी व्यक्त केले. शेअर बायबॅकबाबतही सेबी लवकरच नवे नियम जाहीर करणार आहे.

सीआयआयतर्फे आयोजित एका कार्यक्रमात सिन्हा म्हणाले, इनसायडर ट्रेडिंगसाठी सध्याचे नियम जुने झाले आहेत. इनसायडर ट्रेडिंगचा लगाम खेचण्यासाठी लवकरच नवे नियम जाहीर होतील. शेअर बायबॅकसाठी नवे मार्गदर्शक नियमही जाहीर होणार आहेत. सध्या या दोन्ही प्रकारांत मोठ्या प्रमाणात उलाढाल दिसून येते व सध्याचे नियम यातील गैरप्रकार रोखण्यासाठी सक्षम नाहीत. हे थांबवण्यासाठी व नवे नियम जारी करण्यासाठी सेबीने एक समिती नेमली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत इनसायडर ट्रेडिंगचे नवे नियम जाहीर होतील.

सिन्हा म्हणाले, काही कंपन्या केवळ आपल्या कंपनीच्या शेअर्सचे भाव वाढवण्यासाठी बायबॅकचा वापर करत आहेत. यातून गुंतवणूकदारांच्या पदरी काहीच पडत नाही. या संदर्भात आवाहन केले असून तज्ज्ञ, गुंतवणूकदारांची मते सेबीकडे आली आहेत.

होल्डिंगबाबत सक्ती
खासगी क्षेत्रातील काही कंपन्यांनी किमान पब्लिक होल्डिंगच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. यापैकी 37 कंपन्यांच्या शेअर्सचे स्‍ट्रेडिंग थांबवले आहे. 51 कंपन्यांनी नियमानुसार काम करण्याची हमी दिली आहे. नियमभंग केल्यास परिणाम भोगावे लागतील.
यू.के.सिन्हा, अध्यक्ष, सेबी