आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेअर बायबॅकसाठी नवे नियम लवकरच : सिन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इनसायडर ट्रेडिंग रोखण्यासाठी लवकरच नवी नियमावली जाहीर होईल, असे मत भांडवल बाजार नियामक व नियंत्रक मंडळाचे (सेबी) अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी व्यक्त केले. शेअर बायबॅकबाबतही सेबी लवकरच नवे नियम जाहीर करणार आहे.


सिन्हा म्हणाले, काही कंपन्या केवळ आपल्या कंपनीच्या शेअर्सचे भाव वाढवण्यासाठी बायबॅकचा वापर करत आहेत. यातून गुंतवणूकदारांच्या पदरी काहीच पडत नाही. यासंदर्भात खुले आवाहन करण्यात आले असून तज्ज्ञ, गुंतवणूकदारांची मते सेबीकडे आली आहेत. त्यानुसार लवकरच बायबॅकचे नवे नियम जाहीर होतील. इनसायडर ट्रेडिंगसाठी सध्याचे नियम जुने झाले आहेत. लवकरच नवे नियम जाहीर होतील.