आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Sebi Bill Tweaks Provisions For Penalties, Seizures

कर्जबुडव्यांची खैर नाही, कडक नियमांसाठी हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जाणूनबुजून कर्ज बुडवणार्‍यांवर आता कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा भांडवल बाजार नियामक व नियंत्रक मंडळ सेबीने दिला आहे. बुडीत कर्जाची समस्या सोडवण्यासाठी कडक कायदे बनवावेत यासाठी सेबी आता रिझर्व्ह बँकेशी चर्चा करत आहे. सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी ही माहिती दिली. ज्या कर्जदारांची कर्ज फेडण्याची क्षमता आहे, मात्र ते जाणूनबुजून कर्ज बुडवत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, असे मत सिन्हा यांनी व्यक्त केले.

सिन्हा म्हणाले, यासंदर्भात कडक कायदे बनवण्याबाबत रिझर्व्ह बँकेशी चर्चा सुरू आहे. लवकरच त्यास अंतिम स्वरूप देण्यात येईल. सेबीच्या कार्यकारी मंडळाच्या या आठवड्यात होणार्‍या बैठकीत रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि इन्फ्रास्ट्रक्टर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टबाबत चर्चा होणार आहे. ही बैठक 10 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे होईल.

तीत सर्व मुद्दय़ांवर चर्चा होईल. मुद्दाम कर्ज बुडवणार्‍यांवर कडक कारवाई व्हावी याबाबत सर्वांची सहमती आहे. एनपीएमध्ये सातत्याने वाढ होत असल्यान गतीने पावले टाकली जात आहेत.

एक ऑक्टोबरपासून नवा नोंदणी करार : सेबी
सिन्हा यांनी सांगितले, एक ऑक्टोबरपासून नवा नोंदणी करार लागू होणार आहे. आता कंपन्यांनी त्यासाठी तयार राहावे. नोंदणी कराराऐवजी नोंदणी कायदा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- एखादी संस्था भांडवल बाजाराशी संबंधित असो वा नसो, तपासासाठी सेबीला इतर संस्थांकडून माहिती मिळवता येईल. उदाहरणार्थ कॉल डाटा.
- 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त अनोंदणीकृत संचय बचत योजना आता सीआयएस र्शेणीत येईल.
- अवैध गुंतवणूक योजनांविरुद्ध सेबीला कडक कारवाई करता येईल.
- प्रलंबित प्रकरणाच्या जलद सुनावणीसाठी सेबीला विशेष न्यायालयाची स्थापना करता येईल.