आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी दरात आंतरराष्ट्रीय कॉलसाठी सिमकार्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आपल्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला अत्यल्प दरात आंतरराष्ट्रीय कॉल्स करून बोलण्याकरिता ‘जॅक्सटर’ सिमकार्ड तयार करण्यात आलेले आहे. भारतात प्रथमच व्हॉइस अ‍ॅपद्वारा वायफाय व 3 जी कॉलिंग करता येण्यासाठी जॅक्सटर ट्रॅव्हलर कॅरियर या नावाने प्री-पेड कार्ड बाजारात आणलेले असल्याची माहिती कंपनीचे भारतातील संचालक अमलेंदू पुरंदरे यांनी दिली.

पुरंदरे म्हणाले, जॅक्सटर सिमकार्ड बाजारात सध्या असलेल्या अन्य पर्यायांपेक्षा 85 टक्के स्वस्त दरात ही सेवा उपलब्ध करून देत आहे. ही सेवा 200 हून अधिक शहरांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे. अँड्रॉइड व आय फोनकरिता वायफाय व 3जी कॉलिंग सेवा असलेल्या या सिमद्वारे हाताळण्यास सोपे असे अ‍ॅप देण्यात आलेले आहे. या अ‍ॅपद्वारे जॅक्सटर ते जॅक्सटर विनामूल्य कॉल्सची सोय आहे. या सिमद्वारे अन्य कंपन्यांच्या मोबाइलला कॉल केल्यास कमी दर आहेत.

मेसेजिंगची सोय ही विनामूल्य देण्यात आलेली आहे. मोफत वायफाय सेवा असलेल्या परिसरात स्वस्तात कॉल करण्याची सोय यामध्ये आहे. जॅक्सटर मोबाइल अ‍ॅपमध्ये जॅक्सटर व्हॉइस, जॅक्सटर सिम व जॅक्सटर एसएमएस या सेवा ग्राहकांना देण्यात आलेल्या आहेत.