आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Sky For Tata's Aircraft, Tata Group Completed Its Pact With Singapor Airlines

टाटांच्या विमानांसाठी नवे आकाश, सिंगापूर एअरलाइन्सशी टाटा समुहाचा करार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मिठापासून ते अगदी सॉफ्टवेअरपर्यंत व्यवसायाचे उत्तुंग शिखर गाठणा-या टाटा समूहासाठी आता नवे आकाश खुले झाले आहे. सिंगापूर एअरलाइन्सबरोबर झालेल्या करारानंतर आता टाटा समूह लवकरच भारतात आपली विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज होत आहे. या दोन्ही कंपन्या या विमानसेवेसाठी 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहेत.


भारतामध्ये विमान कंपनी सुरू करण्यासाठी टाटा समूहातील टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स या दोन्ही कंपन्यांमध्ये परस्पर सामंजस्य करार झाला आहे. या विमान कंपनीचे कार्यालय दिल्लीत असेल आणि पूर्ण विमानसेवा देण्यात येणार असल्याचे टाटा सन्सने म्हटले आहे. या संयुक्त विमान कंपनीमध्ये टाटा सन्सचे 51 टक्के, तर सिंगापूर एअरलाइन्सचे 49 टक्के भागभांडवल असेल. भारतामध्ये स्वस्त विमान सुरू करण्यासाठी टाटा समूहाने एअर एशिया या कंपनीबरोबर अगोदरच करार केला आहे.


दरम्यान, भारतामध्ये नवीन विमान कंपनी सुरू करण्यासाठी टाटा सन्सने केलेल्या अर्जाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेकडून मंजुरी देण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या प्रस्तावित नवीन कंपनीमध्ये टाटा सन्सचे दोन, तर सिंगापूर एअरलाइन्सचा एक असे तीन नामनिर्देशित सदस्य असतील. टाटा सन्सकडून अध्यक्षपदासाठी प्रसाद मेनन यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.