आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सुगंधावर आधारित असतील पुढच्या पिढीचे गॅजेट्स...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1960 च्या शतकात तयार चित्रपट ‘सेंट ऑफ मिस्ट्री’ने एका क्रांतिकारी अनुभवाचे वचन दिले. प्रेक्षकांना पीटर लॉरी स्पेनमध्ये फेरफटका मारत असताना चित्रपटगृहात गुलाबाचा सुगंध आणि अत्तराचा सुवास जाणवत असे. हा सुवास प्रत्येक खुर्चीखाली लपवलेल्या प्लास्टिकच्या ट्यूबमधून येत असे. परंतु या अत्तराचे तंत्र जरा कठीण होते. त्यामुळे ही योजना अपयशी झाली. अर्ध्या शतकानंतर विश्लेषकांना वाटते की, आता चित्रपटातील दृश्यांतील सुवास अनुभवण्याची वेळ आली आहे.

आपली इलेक्ट्रॉनिक उत्पादने ऐकू शकतात, स्पर्श केल्यावर बोलू शकतात आणि प्रतिक्रिया देऊ शकतात. परंतु त्यांना सुगंध देणारे करणे जरा कठीण आहे. हे अशामुळे कारण नाकाला वेड्यात काढणे जरा अवघड आहे. मानवी शरीराच्या दुर्गंधीचे तज्ज्ञ कार्बनी रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज प्रेटी यांच्या मते, उद्योजक आणि संशोधक स्मेल कोडला क्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत.