आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात लॉन्च झाले नवीन सोशल नेटवर्किंग अ‍ॅप Mxit

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथ आफ्रिकेतील लोकप्रिय अ‍ॅप Mxit आता भारतात लॉन्च झाले आहे. Mxit ने हे अ‍ॅप गॅरी क्रिस्नच्या हस्ते भारतात लॉन्च केले आहे. हे अ‍ॅप जावा, ios, ब्लॉकबेरी, अ‍ॅन्डाइड आणि नोकियाच्या विडोंजवरदेखील चालते. या अ‍ॅपमध्ये युजर्स फेसबुकसारखे कव्हर पेज, 50 फ्रेन्डससोबत चॅटींग आणि फोटो शेअर करू शकतात. या अ‍ॅपवर साइन इन करून युजर्स एकाचवेळी अनेक प्रोफाइल बनवू शकतात. वेळेनूसार तुम्ही या आकाउंटमध्ये स्विचही करू शकता.

सध्या हे अ‍ॅप जवळजवळ 8000 स्मार्टफोन्स आणि टॅबलेटवर डाउनलोड करण्यात आले आहे. हे अ‍ॅप भारतीयांना आवडेल असे Mxit India Pvt. Ltd. चे CEO सॅम रफस नाललाराज यांचे म्हणने आहे. या अ‍ॅपमध्ये तुम्ही मॅसेजही पाठवू शकता. या अ‍ॅपचे कस्टमाइज व्हर्जनही उपलब्ध आहे जे हिंदी आणि इंग्लिशमध्ये वापरता येते.