आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Syllabus For Businessman Children From Mitcons

उद्योग व्‍यवसायातील आव्‍हानांना तोंड देण्‍यासाठी मिटकॉनचा अभ्‍यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- हल्‍ली नवीन पिढीला कौटुंबिक उद्योग किंवा व्यवसायात रुजू होत असताना आव्हानांना तोंड द्यावे लागते. अशावेळी ही आव्‍हाने यशस्‍वीपणे पेलण्‍यासाठी औपचारिक प्रशिक्षण देण्याची गरज भासते. याचा विचार करून मिटकॉनने एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्‍याचे ठरवले आहे. येत्या ऑगस्टपासून या अभ्‍यासक्रमास सुरूवात होणार असल्‍याची घोषणा व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बावडेकर यांनी केली.

बाणेर मधील संस्थेच्या संकुलात हा अभ्यासक्रम येत्या 19 ऑगस्ट पासून सुरु होईल आणि पहिली बॅच 2014मध्‍ये बाहेर पडेल अशी माहिती देत बावडेकर म्‍हणाले, वाहन उदयोग, अभियांत्रिकी, अन्नप्रक्रिया, पर्यटन अशा क्षेत्रात असलेल्या तरुण, होतकरूंना याचा फायदा घेता येणार आहे. सध्या मुंबई आणि अहमदाबादेतील संस्था असा अभ्यासक्रम राबवितात मात्र त्याचे शुल्क सात ते आठ लाख रुपयांच्या घरात आहे. मिटकॉन एक लाख 25 हजार रुपये शुल्क आकारत आहोत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील छोट्या आणि लघु उद्योजकांच्या मुलांना तो फायदेशीर ठरेल.

असा अभ्यासक्रम सुरु करण्यामागची करणे स्पष्ट करताना ते म्हणाले, की उद्योजकांच्या मुलांना आर्थिक शिस्त, जागतिक स्पर्धा, सतत बदलणारे नियम आणि कायदे याची माहिती नसते. तसेच परदेशात माल पाठविण्यास निर्यात योग्य दर्जा ठेवावा लागतो. दिल्ली-मुंबई मालवाहतूक पट्टा (कॉरीडॉर) जसजसा अंमलात येईल तशी छोट्या सेवा आणि उत्पादन उद्योगांची गरज वाढेल, अशा वेळी स्पर्धेत टिकण्यास आमचा अभ्यासक्रम सक्षमता मिळवून देइल.

कौटुंबिक व्यवसाय हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) 60 टक्के हिस्सा तसेच ओद्योगिक उत्पादनाचा 90 टक्के वाटा कौटुंबिक व्यवसायांचा आहे. सरकारी क्षेत्रापाठोपाठ 27 टक्के रोजगार या व्यवसायातून मिळतात. मध्यम आकाराचे 50 ते 1000 कोटी रुपये वार्षिक उलाढाल असणारे 6100 व्यवसाय देशात कार्यरत आहेत. मात्र मालकी हक्काचे वाद, नव्या पिढीची अनिच्छा, योग्य प्रशिक्षण न मिळणे असे अनेक अडथळे असल्याने हे व्यवसाय म्हणावे इतके विस्तारू शकत नाहीत ती पोकळी मिटकॉन भरून काढणार आहे.