आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरूणांवर मोहिनी घालण्‍यास नवी नॅनो सज्‍ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगामध्ये इतिहास रचणारी ही कार आता काही बदलांसह पुन्हा बाजारात उपलब्ध होणार आहे. टाटाने या कारच्या किमतीमध्येही बदल केला आहे. आता कंपनीने ही कार दुचाकीचा पर्याय म्हणून देण्याऐवजी वेगळा विचार केला आहे. युवकांना आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. शहरातील तरुण या कारकडे आकर्षित झाल्यास विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची कंपनीला आशा आहे. या वेळी कारमध्ये कोणताही मेकॅनिकल बदल करण्यात आलेला नाही. कारमध्ये पॉवर स्टिअरिंग सुविधा मिळेल, अशी अपेक्षा होती. ती ऑक्टोबरपर्यंत बसवण्यात येणार आहे.

सध्या जे बदल करण्यात आले आहेत, त्यात कारचे स्टिअरिंग व्हील किंचित मोठे केले आहे. त्याचा गोलाकार वाढवला आहे. त्यामुळे स्टिअरिंग फिरवण्याचे परिश्रम कमी होतील. आता प्रश्न हा आहे की, बदल काय आहेत. कारमध्ये पुढे व मागच्या बाजूला क्रोमची स्ट्रीप देण्यात येत आहे. तसेच मागच्या बंपरमध्ये आणखी काही छिद्रे दिली आहेत. त्यामुळे कारचे इंजिन थंड राहावे म्हणून अधिक हवा मिळेल. तसेच रॉयल गोल्ड आणि डेझल ब्लू या दोन नवीन रंगांत कार उपलब्ध आहे. ब्लॅक इंटेरिअरचा पर्यायही आहे. त्यामुळे एलएक्स व्हर्जनला स्पोर्र्टी लूक देण्यात आला आहे. कारला पारंपरिक लूक मिळावा म्हणून टाटाने दोन ग्लोव्ह बॉक्स ट्रीमचाही समावेश केला आहे. त्यात सीएक्स आणि एलएक्स ट्रीम्स आहेत. डॅशबोर्डमध्ये भरपूर अंतर आहे. एक बॉक्स असता तरी चालले असते. कारण त्यामुळे बॅग ठेवायला जागा राहत नाही. एलएक्स मॉडेलमध्ये चार स्पीकरची ऑडिओ सिस्टिम आहे. पावर विंडोच्या स्विचमध्येही सुधारणा केली आहे. गिअर लीव्हर मागे आहे. तसेच 12 वे सॉकेट समोरची जागा कव्हर करते.