आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन ट्रेंड: अ‍ॅपवरच पसंत करा आता सलवार-कुर्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपल्या पसंतीचा पोशाख शिवायचा, तर टेलरकडे असलेल्या कॅटलॉगमध्ये शोधाशोध करणे आले; पण आता सलवार-कुर्ता, डिझायनर ब्लाऊज थेट तुमच्या स्मार्टफोनवर आले आहे. इंटरनेटची कटकट नसल्याने ऑफलाइन राहून ड्रेसची निवड करता येते. त्यामुले डेटा संपतोय का याची चिंता करण्याची गरज नाही.

बाजारातील सलवार-कुर्त्याचे नवीन प्रकार, हल्लीचे लेटेस्ट डिझायनर ब्लाऊज शोधायचे तर टेलरकडे जाणे मस्ट; पण या सलवार-कमीज नावाच्या अ‍ॅपमध्ये एकाच िठकाणी जवळपास १५० प्रकार आहेत.

टेलरकडे उपलब्ध असलेल्या ड्रेस कॅटलॉगचे रूपांतर अ‍ॅपमध्ये करण्यात आले आहे. यात सलवार कमीज आणि डिझायनर ब्लाऊज असे दोन प्रकार आहे. छायाचित्र सुस्पष्ट असल्याने पसंतीच्या डिझाइनची निवड करणे सोपे जाते. शिवाय इंटरनेटची गरज नसल्याने डेटा युसेज होण्याचा प्रश्नच येत नाही, असे शॉर्ट फॉरमॅट डिजिटल प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नियती शहा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. शॉर्ट फॉरमॅट ही डिजिटल एन्टरटेनमेंट क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी असून ऑफलाइन अ‍ॅप स्टोअर हे खास वैशिष्ट्य आहे. संगीत, चित्रपटांपासून ते खेळापर्यंत विविध खेळांचे ऑफलाइन अ‍ॅप कंपनीकडे आहेत. आपल्या पसंतीचे ड्रेस ग्राहकांना तयार करता येऊ शकतील, अशा अ‍ॅपवर सध्या काम करत असल्याचेदेखील शहा यांनी सांगितले.

अ‍ॅप कसे मिळवाल?
अ‍ॅप म्हटले की लगेच प्लेस्टोअरमध्ये जाऊन डाऊनलोड करण्याचा विचार येतो; पण हे अ‍ॅप ऑफलाइन आहे. शॉर्ट फॉरमॅटच्या ‘बिस्कुट’ ब्रँडअंतर्गत हे अ‍ॅप मिळवता येते. शहरातल्या मोबाइल रिचार्ज करण्याच्या दुकानात जाऊन हे अ‍ॅप खरेदी करता येते.
या शहरांत उपलब्ध अमरावती, कोपरगाव, श्रीरामपूर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद.

अ‍ॅपची वैशिष्ट्ये
*इंटरनेटची गरज नसल्याने ऑफलाइन माध्यमातून कितीही वेळा अ‍ॅपमधील पोशाखांच्या डिझाइन बघता येणे शक्य.
*डिझाइन अल्बम अ‍ॅपमध्ये असल्याने साडी, ब्लाऊज, सलवार, कुर्ता यांचे डिझाइन निवडणे सोपे.
*बाजारातील नव्या स्टाइल आणि डिझाइनच्या पेहरावांचा शोध घेता येतो.
*एखादे आवडते डिझाइन वॉलपेपर म्हणूनही लावता येऊ शकते.

कोणाला फायदा?
*विशेषकरून ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा नसलेल्या महिला.
*बाजारातील बदलता ट्रेंड आणि फॅशनविषयक मासिके उपलब्ध होऊ न शकणा-या महिला.
*महागड्या डिझायनर पोशाखांवर जास्त खर्च करणे न परवडणा-या महिलांसाठी.
*आपल्या नेहमीच्या टेलरकडे आपल्या पसंतीचा आणि स्टायलिश सलवार-कुर्ता शिवल्यामुळे किफायतशीर दरात स्टाइलबाज होता येते.