आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाही मिळणार कार, गृह कर्जावर व्याज सवलत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कार तसेच गृहकर्जावरील व्याजदरात देण्यात येणारी सवलत नवीन वर्षातही चालूच राहणार आहे. पंजाब नॅशनल बँकेतर्फे कार लोन योजनेला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया गृह तसेच कारसाठीच्या कर्जावरील व्याजदरात मार्च 2012 पर्यंत सूट देणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेने कार कर्जासाठी 14 ऑक्टोबरपासून सुरू केलेली व्याजदर सवलत योजना आता 31 जानेवारीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी ही योजना डिसेंबरपर्यंतच होती.
बँकेचे मुख्य व्यवस्थापक (रिटेल बँकिंग) एस.पी. सिंह यांनी सांगितले की, कार कर्जासाठी व्याजदरात देण्यात येणारी सवलत आता 31 जानेवारीपर्यंत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत बँक तीन वर्षांसाठी 11.25 टक्के ते 11.75 टक्के व्याजावर कारसाठी कर्ज देत आहे. याप्रमाणे गृहकर्जावरही बँक सवलत देत आहे.
या योजनेअंतर्गत बँक 30 लाखांपेक्षा अधिकच्या गृहकर्जावर कितीही मुदतीसाठी व्याजात 0.80 टक्के सवलत देत आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, बँक गृह तसेच कार कर्जावरील व्याजदरात विशेष सवलत देणारी योजना 31 मार्च 2012 पर्यंत सुरू ठेवणार आहे. या योजनेनुसार बँक विविध श्रेणीतील गृहकर्जावर 10.75 टक्के ते 12.25 टक्के व्याज दराने कर्ज देत आहे.
यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा बँकेचा निर्णय आहे. वाहन खरेदीसाठी घेण्यात येणाºया कर्जावरील व्याजात बँक एक टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. या योजनेत बँक वाहन कर्जावर 11.75 टक्के ते 13.25 टक्के व्याज आकारत आहे.

ग्राहकांना दिलासा
पंजाब नॅशनल बँकेकडून कार कर्जासाठी व्याजदरात देण्यात येणारी सवलत आता 31 जानेवारीपर्यंत मिळणार
सेंट्रल बँक ऑफ इंडिया गृह तसेच कार कर्जावरील व्याजदरात विशेष सवलत देणारी योजना 31 मार्च 2012 पर्यंत सुरू ठेवणार