आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानाचे सुसूत्रीकरण गरजेचे : अरुण जेटली, वाढीतील घट, चढती महागाई अस्वीकारार्ह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आर्थिक वाढीतील घट आणि चढती महागाई स्वीकारार्ह नाही. किमतीत सुधारणांसह आर्थिक विकासदराची अपेक्षित वाढ साध्य करण्यासाठी हे चित्र बदलण्याची गरज असल्याचे मत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.

महागाईच्या चढत्या आलेखामुळे आर्थिक वाढ कमी होते आणि ती परिस्थिती बदलण्याची गरज आहे. परंतु त्यासाठी नेमकी कारणे काय आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे अन्यथा या परिस्थितीचे गणित सोडवणे कठीण आहे असेही जेटली म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. अर्थमंत्री झाल्यानंतर जेटली यांची ही पहिलीच बैठक होती. यूपीएच्या काळातील लोकानुनयी घोषणा आणि धोरणात्मक लकवा ही प्रमुख कारणे यामागे असल्याचे ते म्हणाले.
आर्थिक शिस्त हवीच
अनुदानाचे प्रमाण लक्षणीय वाढत असल्याने त्यात सुसूत्रता आणण्याची गरजही वित्तमंत्र्यांनी व्यक्त केली. अनुदानाचा खर्च वाढवणार्‍या निवडणुकांपूर्वीच्या आकर्षक लोकप्रिय उपाययोजना सरकार आणणार नाही असे सांगून ते पुढे म्हणाले की, जर कर्ज माफ केली तर सरकारी खजिना रिकामा होईल आणि पर्यायाने आर्थिक शिस्त कुचकामी होईल आणि ते देशाच्या अर्थव्यवस्थेला योग्य ठरणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.