आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकर्षक लूक, अॅडव्हान्स फीचर्ससह गुगलचा नवा अॅप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क | ऑडिओ-व्हिडिओ मेसेजसाठी तुम्ही जर व्हॉट्सअॅप, हँगआऊट, हाइकसारख्या अॅपचा वापर करत असाल तर गुगलचा मेसेंजर अॅप जास्त सुविधाजनक ठरू शकतो. गुगलने नुकताच आपल्या अँड्राॅइड वापरकर्त्यांसाठी मेसेंजर हा नवा अॅप सादर केला आहे. यात अनेक अद्वितीय फीचर्स आहेत. प्ले स्टोअरवर हे अॅप झळकल्यानंतर २४ तासांतच ५ हजार युजर्सनी ते डाऊनलोड केले आणि ८६०० हून जास्त वापरकर्त्यांनी त्याला ५ पैकी ४.४ रेटिंग दिले आहे.
बहुतांश वापरकर्त्यांनी त्याला डिझायनर लूक असणारा अॅप असे म्हटले आहे. काही जणांनी यात बबल्स कलर्स तसेच फाँट साइज कस्टमायझेशनची कमतरता दर्शवली आहे. ही कमतरता नसती तर हे अॅप बुजुर्गांसाठीही सुलभ बनले असते. यास अँड्राॅइडच्या क्लासिक अॅपचे अॅडव्हान्स व्हर्जन म्हणता येईल. प्ले स्टोअरद्वारे हे अॅप इन्स्टॉल करताच डिफॉल्टची डिझाइन आकर्षक बनवते. हे अॅप अँड्राॅइड व्हर्जन ४.१ वरही इन्स्टॉल होऊ शकते.
आकर्षक शेअरिंग सुविधा
मेसेजसह तत्काळ फोटो क्लिक करून पाठवायचा असेल तर अटॅचमेंट सुविधेसह कॅमेरा ऑन होतो. आवश्यकतेनुसार यास डिफॉल्ट मेसेज अॅपही बनवता येईल. ज्याला टाळायचे आहे, त्यास ब्लॉक करता येते, अनेक फोटो एकाच वेळी शेअर करता येतात. सर्व मेसेजमधून एकाचा शोध घ्यायचा असेल तर आद्याक्षरानुसार कलर कोडिंगने ते काम सोपे होते. डिफॉल्टमध्ये असणारीच टोन नव्या मेसेजमध्ये ऐकू येईल. प्रत्येक मेसेज वेगवेगळ्या रंगात दिसतो. त्यामुळे हे मेसेंजर
इतरांपेक्षा वेगळे ठरते व दिसते.