आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहकर्ज घ्या, तीन महिने ईएमआय भरू नका, बजाज फायनान्सची अनोखी योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई । बजाज फायनान्स या वित्तीय सेवा पुरवठादार कंपनीने कर्जदारांसाठी अनोखी गृहकर्ज योजना आणली आहे या नव्या योजनेमध्ये कर्जदाराला पहिल्या तीन महिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा हप्ता द्यावा लागणार नाही. साधारणपणे 25 लाख ते 15 कोटी रुपयांच्या दरम्यान कर्जाची अपेक्षा असलेले पगारदार आणि व्यावसायिक व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे.

कर्र्जदार व्यक्तीला आपल्या महिन्याचे आर्थिक नियोजन व्यवस्थित करता यावे या दृष्टिकोनातून ग्राहकाला त्याच्या गृहकर्जावर पहिल्या तीन महिन्यांसाठी कोणताही हप्ता द्यावा लागणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

कर्ज घेणार्‍या व्यक्तीला डाऊन पेमेंट, मुद्रांक शुल्क, नोंदणी तसेच अन्य खर्चांसाठी आपली बरीचशी बचत खर्ची घालावी लागते. त्यासाठी अशा प्रकारच्या उत्पादनांची गरज असल्याचे मत कंपनीने व्यक्त केले आहे. पहिल्या तीन महिन्यांतील व्याज हे मुद्दल रकमेत समाविष्ट केले जाईल. कर्ज परतफेडीचे वेळापत्रक हे या रकमेनुसार मोजले जाईल; परंतु ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त व्याज वा शुल्क यासाठी द्यावे लागणार नाही.

कर्जदारांना दिलासा
पहिल्या तीन महिन्यांतील व्याज हे मुद्दल रकमेत समाविष्ट केले जाईल.
ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त व्याज वा शुल्क यासाठी द्यावे लागणार नाही
कर्जदार व्यक्तीला आर्थिक नियोजन करता येईल