आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मासे विकण्यापासून ते स्मार्टफोनची No. 1 कंपनी, जाणून घ्या सॅमसंगचा इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Samsung Smartphone)

गॅजेट डेस्क
- उद्या म्हणजेच 3 सप्टेंबरला गॅलक्सी नोट 4 लॉन्च होणा आहे. हा फोन 9 सप्टेंबवला लॉन्च होणार्‍या आयफोन 6 ला चांगलीच स्पर्धा देणारा फोन आहे. त्यामुळे या फोनला कसा रिस्पॉन्स मिळतो याकडे सर्वच गॅझेट प्रेमींचे आणि तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का, भाजी, नुडल्स आणि मासे विकणारी सॅमसंग ही कंपनी आज जगातील पहिल्या क्रमांकाची स्मार्टफोन मेकर कंपनी आहे. चला तर मग पाहूयात मासे विकणार्‍या या कंपनीचा स्मार्टफोन कंपनी बनण्यापर्यंतचा प्रवास...

40 लोकांसोबत सुरू झाली कंपनी
सॅमीने 1938 मध्ये 40 लोकांसोबत साऊथ कोरियामध्ये या कंपनीची सुरूवात केली. तेव्हा या कंपनीचे मुख्य काम ड्राय फिश निर्यातीचे होते. सॅमसंग ग्रूपने आतापर्यंत जवळपास 80 वेगवेगळे व्यवसाय केले आहेत. पुढे हळू-हळू या कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवण्यास आणि विकण्यास सुरूवात केली. यामध्ये टीव्ही, फ्रीज या सोबतच मोबाईल फोन आणि स्वयंपाक घरात उपयोगी असणार्‍या वस्तूंचा समावेश होता. सॅमसंगला आज या उंचीवर नेण्यासाठी या कंपनीचे फाऊंडर बायुंग चल ली (Byung-Chull Lee) यांचे खुप मोठे योगदान आहे.
लीड घेण्यास यशस्वी
मोबाईल डिव्हाईस सेगमेंटमध्ये सॅमसंगचे सर्वात पहिले उद्दीष्ट एक लिडिंग कंपनीच्या रुपाने पुढे येण्याचा होता. फीचर बेस्ट नोकीया आणि अॅपल आयफोनला मागे टाकत सर्वात वरचे स्थान पटकावण्यास सॅमसंग यशस्वी ठरले. ही कंपनी आपल्या फोन्सच्या साह्याने प्रत्येकाच्या खिशापर्यंत पोहोचण्यास यशस्वी ठरली.

पुढील स्लाईडवर पाहा, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सबद्दलचे काही इतर रोमांचक माहिती