आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिस शोमधील बहुचर्चित आकर्षक कार, वाचा कारच्या फिचर्सविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या महिन्यात पॅरिस ऑटोमोटिव्ह जगताचे केंद्र बनले होते. येथे आयोजित जगातील सर्वात मोठ्या मोटार शोमध्ये अल्ट्रा इफिशियंट हॅचबॅकपासून सुपर श्रेणीतील गाड्या पाहावयास मिळाल्या. यातील काही कार लवकरच रस्त्यांवर धावताना दिसतील.
मर्सिडीझची पिवळ्या रंगातील कॅनेरी कार
मर्सिडीझ एएमजी जीटी : मर्सिडीझच्या स्टॉलवर प्रमुख आकर्षण होते कॅनेरी यलो एएमजी-जीटी. जीटी आिण जीटी-एस या दोन श्रेणींमध्ये ही कार उपलब्ध होईल. याचे वैशिष्ट्य म्हणजे कारमध्ये एएमजीची ब्रँड न्यू ४.० लिटरचे टर्बोचार्ज्ड व्ही-८ मोटर आहे. जीटी-एसचा सर्वोच्च वेग ३१० केपीएच असून ४ सेकंदांतच ही कार ताशी १०० किमीचा वेग घेते. यापूर्वीच्या एसएलएस एएमजीचे हे आधुनिक रूप आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी जागतिक बाजारात ही कार उपलब्ध होईल. भारतातही ती लवकरच दाखल होईल, अशी आशा आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, इतर काही आकर्षक कार...