आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी बँकांची सरकारी बँकांवर आघाडी, नफा, एनपीए व व्यवस्थापनात खासगी बँकांची सरशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बँक आणि विमा क्षेत्रात सरकारी कंपन्यांचा दबदबा आजही कायम असला तरी नफा, अनुत्पादक कर्जे व उत्तम प्रशासनाच्या बाबतीत खासगी कंपन्यांनी सरकारी कंंपन्यांवर आघाडी घेतली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार खासगी क्षेत्रातील नव्या व जुन्या बँका तशा नफ्याच्या बाबतीत खासगी विमा कंपन्या सरकारी बँका व विमा कंपन्यांपेक्षा खूप पुढे आहेत. खासगी क्षेत्रातील बँकांचे मालमत्ता व्यवस्थापनही चांगलेच सुधारले आहे. वर्ष २०१२-१३ मध्ये नव्या खासगी बँकांच्या मालमत्तेवरील परतावा १.७४ टक्के आणि शेअरप्रती परतावा १६.५१ टक्के राहिला. सरकारी बँकांच्या बाबतीत हे प्रमाण अनुक्रमे ०.७८ टक्के आणि १३.२४ टक्के राहिले. अनुत्पादक कर्जाच्या (एनपीए) बाबतीत खासगी बँकांनी सरकारी बँकांवर सरशी मिळवली आहे. खासगी बँकांत अनुत्पादक कर्जाचे प्रमाण ०.५२ टक्के तर सरकारी बँकांत हे प्रमाण २.०२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
बँकांतील कर्ज तसेच ठेवींंच्या बाबतीत सरकारी बँकांची हिस्सेदारी सुमारे ७० टक्के आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ७२ टक्के विमा बाजारपेठेवर ताबा आहे. तज्ज्ञांच्या मते, खासगी तसेच सरकारी बँकांतील तुलना अनेक अर्थाने योग्य नाही. सरकारी बँका शहरांसह दुर्गम भागातही कार्यरत आहेत, तर बहुतेक खासगी बँका द्वितीय श्रेणीच्या शहरांपुरत्याच मर्यादित आहेत. असे असले तरी त्यांचे व्यवस्थापन, कार्यप्रणाली आणि मालमत्तेचे प्रमाण यांची तुलना व्हायला हवी. व्यवस्थापन आणि असेट क्वालिटीच्या बाबतीत सरकारी बँकांना खासगी बँकांकडून भरपूर काही शिकण्यासारखे आहे.
सरकारी विरुद्ध खासगी
बाब२६ सरकारी बँका७ खासगी बँका
एकूण जमा५७,४५,६९७१०,२१,९३९
कर्ज४४,७२,७७४८,७३,३११
निव्वळ व्याज नफा२.५७ टक्के३.३० टक्के
(सर्व आकडे २०१२-१३ चे, जमा तसेच कर्ज कोटी रुपयांत)