आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सचे नवे शिखर, निफ्टीचा नवा उच्चांक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्टेट बँक आॅफ इंडियाची चमकदार आर्थिक कामगिरी आणि त्यातच महागाईने आॅक्टाेबर महिन्यात गाठलेला पाच महिन्यांचा नीचांक या दाेन्ही गाेष्टी बाजाराला सुखद धक्का देणा-या ठरल्या. उत्साह दुणावलेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या जाेरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने १०६ अंकांची उसळी घेत २८ हजारांच्या पुढे जात नवे शिखर सर केले.
विदेशी गुंतवणूकदारांनी सुरू ठेवलेली आक्रमक खरेदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घट यामुळे बाजारातील खरेदीला आणखी पाठबळ मिळाले. निफ्टी ३२.०५ अंकांनी वाढून ८३८९.९० अंकांच्या नव्या पातळीवर गेला आणि त्याने आधीचा ८३८३.३० अंकांचा (१२ नाेव्हेंबर) विक्रम माेडून काढला. दिवसअखेर सेन्सेक्स १०६.०२ अंकांनी वाढून २८,०४६.६६ अशा नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला.