आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान एअरलाइन्सच्या मोठ्या आयडिया, अमेरिका-युरोपदरम्यान कंपन्यांनी अंगीकारले नवीन मॉडेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या दशकात प्रचंड स्पर्धा, खर्च कपात आणि व्यवस्थापनाच्या चुकांमुळे पीपल एक्स्प्रेस, इओएस यांसारख्या एअरलाइन्सना जमिनीवर उतरावे लागले. परंतु, तीन नव्या एअरलाइन्सना वाटते की, त्यांचे मॉडेल यशस्वी होऊ शकते.
ग्लोबल नियमांमधील बदलांमुळे आता परदेशी एअरलाइन्स अमेरिकेत हवी तेथे सेवा चालवू शकतात. पूर्वी त्यांनी आपल्या देशातून निर्धारित अमेरिकेतील शहरापर्यंत ऑपरेट करण्याची परवानगी होती. ऑटोमॅटिक टिकटिंग आणि चेक-इनमुळे भल्या मोठ्या ग्राउंड स्टाफची गरज संपुष्टात आली आहे. मुख्य एअरलाइन्सच्या विलीनीकरणाने भाडे तर वाढले, परंतु आसन व्यवस्था तशीच आहे.
ग्लोबल आंत्रप्रेन्योरचा एक समूह विश्वास करताे की, या कारणांमुळे नव्या लोकांसाठी जागा तयार होऊ शकते. चांगली विमाने त्यांची मदत करत आहे. बोइंग ड्रीमलाइनर जुन्या जेट विमानांच्या तुलनेत वर्षभर चालवण्यात दीड कोटी डॉलर स्वस्त पडतो. नवीन एअरलाइन ला कॅम्पेन न्यूयॉर्क आणि पॅरिस दरम्यान बोइंग ७५७ विमान चालवते. त्याची सर्व आसने बिझनेस क्लासची आहेत. विमानात गर्दीही कमी असते. भाडे फेरीमागे २००० डॉलर आहे. मोठ्या एयरलाइनमध्ये अशा एका आसनाचे भाडे पाच चे अकरा हजार डॉलर आहे.
युरोप व अमेरिकेत स्पिरिट आणि रयान एअर या स्वस्त एअरलाइन नवे ग्राहक आकर्षित करत आहेत. २००१ मध्ये वॉव एअरची स्थापना करणारे स्कल मोगेन्सन सांगतात, युरोप आणि अमेरिकेत वाजवी भाड्याचे मॉडेल यशस्वी होत आहे.
या मॉडेलमध्ये नफा कमावण्याचीदेखील अपेक्षा आहे. वॉव छोटे जेट विमानांचा वापर करते. यातून विमान रिकामी चालण्याचा धोका राहत नाही.
तीन नवे मॉडेल
१ वॉव एअर – आइसलँडस्थित नव्या एअरलाइनच्या स्पिरिट एअरलाइन्ससारखे स्वस्त तिकीट ऑफर करण्याची योजना आहे. मात्र, बॅगेज आणि इतर चार्ज लागतील. वॉव मर्यादित बॉडीचे ए- ३२ विमान वापरते. त्यांना जास्त इंधन लागत नाही. पुढील वर्षी बोस्टन, बाल्टिमोरपासून रिकजेविकपर्यंत फे-या सुरू होतील. युरोपच्या १८ शहरांमधील त्याची सेवा सुरू आहे
२ ला कॅम्पेन – एअरलाइन्सची सर्व आसने बिझनेस श्रेणीची आहेत. ती विमानाच्या पुढील आणि मागील आसनांमधील भाड्याचे अंतर नष्ट करू इच्छिते, तर ७४ आसनांच्या बोइंग ७५७ चा वापर करते. सामान्य ७५७ मध्ये यापेक्षा दुप्पट आसने असतात. न्यूयॉर्क व पॅरिस दरम्यान फे-या चालतात. सध्याच्या बिझनेस श्रेणीचे भाडे ९००० डॉलरच्या तुलनेत २००० डॉलर भाडे खूपच कमी आहे.
३ नॉर्वेजियन – कमी भाड्याच्या युरोपीय एअरलाइन अमेरिकेला आपली प्रमुख बाजारपेठ बनवू इच्छिते. नॉर्वेजियन अमेरिकेहून युरोपच्या मध्ये बोइंगचा नवा ७८७ ड्रीमलाइनर आणि युरोपात ७३७ – ८०० विमान चालवते. न्यूयॉर्क, लॉस एंजिलिस, ओरलँडोहून लंडन, ओस्लो आणि कोपेनहेगन दरम्यान त्याचे सरळ उड्डाण आहे. या फे-यांचे भाडे २५० डॉलर
आहे.