आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील प्रसिद्ध उद्योगपती आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अनिल अंबानी यांचा नुकताच (4 जून) वाढदिवस झाला. अनिल यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर व्यवसायात यशाचे शिखर गाठले आहे. अनेक बाबतीत ते आपले मोठे भाऊ मुकेशपेक्षाही आघाडीवर आहेत. अनिल यांच्या यशामागे सर्वात मोठे योगदान त्यांचे दिवंगत वडील धीरूभाई अंबानी यांचे मोठे योगदान आहे. आज आम्ही अनिल-मुकेश आणि रिलायन्सच्या यशामध्ये महत्वाची भूमिका निभावणा-या धीरूभाई अंबानी यांच्याबाबतीत सांगणार आहोत. धीरूभाई आणि अंबानी बंधूंना आयुष्यात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागले.
'कर लो दुनिया मुठ्ठी में...' हे स्वप्न धीरूभाई अंबानी यांनी पाहिले होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी रात्रं-दिवस मेहनत केली. त्यांच्या याच जिद्दीमुळे इतिहासाच्या पानावर ते अजूनही जिवंत आहेत.
गुजरातमधील एक छोटसे गाव चोरवाड येथील एका शाळेत शिक्षक असलेले हिराचंद गोवर्धनदास अंबानी यांचे धीरूभाई तिसरे सुपूत्र. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 मध्ये झाला. पाच भावंडांमध्ये धीरूभाई हे तिसरे होते. रमणिकलाल, नटवरलाल, धीरूभाई आणि दोन बहिणी त्रिलोचना आणि जसुमती ही हिराचंद यांच्या अपत्यांची नावे.
हलाखीच्या परिस्थितीमुळे धीरूभाईंना शालेय शिक्षण सोडावे लागले. त्यांनी लहानपणापासूनच घरी आर्थिक मदत करण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी ते गिरनार येथे भजीचे दुकान चालवत होते. तिथे येणा-या पर्यटकांवर दुकानाचे उत्पन्न ठरत असत.
धीरूभाईंनी आपली पहिली नोकरी 1949 साली वयाच्या 17 व्या वर्षी केली. काबोटा नावाच्या जहाजाने ते यमन येथील एडन शहरात पोहोचले होते. तिथे मोठे भाऊ रमणिकलाल यांनी त्यांची व्यवस्था केली होती. त्यामुळे त्यांना परदेशात काम शोधण्यास कोणताही त्रास झाला नाही.
मात्र, धीरूभाईंच्या मनात काही वेगळेच सुरू होते. त्यासाठी ते 1954मध्ये मायदेशी परतले. धीरूभाई यमनमधून मुंबई येथे आल्यानंतर ते एका छोटयाशा घरात राहण्यास आले होते. मुंबई येथील याच घरी मुकेश अंबानी यांचे बालपण गेले. वर्ष 1955मध्ये 500 रूपये घेऊन ते आपले नशीब आजमवण्यासाठी बाहेर पडले. आणि तेथूनच सुरू झाला त्यांचा व्यावसायिक प्रवास. त्यानंतर धीरूभाईंनी कधीच मागे वळून पहिले नाही. त्यांचे नाव देशच नाही तर संपूर्ण जगात पोहोचले.
सहा जुलै 2002 रोजी धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले. त्यावेळी ते 62 हजार कोटी रूपयांचे मालक होते. सध्या त्यांची मुले मुकेश आणि अनिल अंबानी हे साम्राज्य सांभाळत आहेत. वडीलांप्रमाणे आज या दोन्ही भावांनी आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवला आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगभरातील सर्वात महागडया घराचे मालक असतानाही आजही त्यांना आपले गुजरात येथील चोरवाड गावामधील वडिलोपार्जित घर आवडते. अँटालिया या मुकेश अंबानी यांच्या घराची ओळख ही जगभरातील महागडया घ्ारामंध्ये होते. 5500 कोटी रूपयांपेक्षाही जास्त मुकेश यांच्या या घराची किंमत आहे. येथे हेलीपॅडपासून, थिएटर, जिम, कार पार्किंग अशा एकापेक्षा एक लक्झरीयस सुविधा आहेत.
फोटोंमधून जाणून घ्या चोरवाड येथील धीरूभाई अंबानी यांचे घर. त्याचबरोबर पाहा मुकेश अंबानी यांनी बालपण घालवलेल्या घराची छायाचित्रे...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.