आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील 16 व्‍या श्रीमंत व्‍यक्‍तीच्‍या पार्टीमध्‍ये पोहोचले मोदी-अडवाणी, पाहा फोटो...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील दिग्‍गज उद्योगपती आणि अदानी ग्रूपचे प्रमूख गौतम अदानींचा सोमवारी वाढदिवस होता. भारतातील टॉप 100 श्रीमंतांच्‍या यादीत समावेश असलेल्‍या गौतम यांचा जन्‍म 24 जून 1962 रोजी अहमदाबाद येथे झाला. त्‍यांचे वडिलांचे नाव शांतीलाल आणि आईचे नाव शांता अदानी होते. गौतम यांना सात भाऊ आणि बहिण आहेत. गरीबीचा सामना करीत नोकरीच्‍या शोधार्थ गौतम यांचे वडील गुजरातच्‍या उत्तर भागात पोहोचले आणि तिथेच स्‍थायिक झाले.

17980 कोटी रूपयांचे मालक असलेल्‍या गौतम यांच्‍या पत्‍नीचे नाव आहे प्रिती अदानी. त्‍यांना जीत आणि करण नावाचे दोन मुले आहेत. नुकताच करणच्‍या लग्‍नामुळे अदानी परिवाराची भारतात मोठी चर्चा झाली होती. आज आम्‍ही तुम्‍हाला गौतम यांच्‍या याच मुलाच्‍या शाही लग्‍न आणि रिसेप्‍श्‍ानचे फोटो दाखवणार आहोत. ज्‍यावरून तुम्‍हाला गौतम यांच्‍या संपत्तीची कल्‍पना येईल.

गौतम अदानी यांचा मुलगा करण आणि परिधी श्रॉफ यांचा विवाह 13 फेब्रुवारीला झाला. गोवामध्‍ये झालेल्‍या लग्‍नाच्‍या पार्टीनंतर 15 फेब्रुवारीला पहिला स्‍वागतसमारंभ अहमदाबाद येथील कर्णावती क्‍लबमध्‍ये झाला.

या पार्टीत सुमारे 5 ते 6 हजार लोक सामील झाले होते. यामध्‍ये गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी, लालकृष्‍ण अडवानी, भाजपचे नेते रविशंकर प्रसाद, अमरसिंग, मुरारी बापू यांच्‍यासह गुजरातचे मंत्री आणि अनेक व्‍हीव्‍हीआयपी पाहुणे आले होते.

करण-परिधीच्‍या लग्‍नाचा दुसरा स्‍वागत समारंभ 17 फेब्रुवारी रोजी झाला. या भव्‍य कार्यक्रमात दोन्‍ही कुटुंबियांनी मुंद्रा टाऊनशिप येथे पार्टीचे आयोजन केले होते. 17 फेब्रुवारीची ही खास पार्टी अदाणी ग्रूपने आपल्‍या कर्मचा-यांसाठी ठेवली होती. कच्‍छमध्‍ये झालेल्‍या या सर्वात मोठया स्‍वागत समारंभात जगभरातील सुमारे दहा हजारपेक्षा जास्‍त पाहुणे सहभागी झाले होते.

उल्‍लेखनीय म्‍हणजे यापूर्वी 13 फेब्रुवारीला गोवाच्‍या ग्रँड हयात हॉटेलमध्‍ये झालेल्‍या लग्‍नास सुमारे 500 पाहुणे आले होते. यामध्‍ये अनिल-टीना अंबानी, मुकेश-नीता अंबानी, कोकिलाबेन, नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री शरद पवार, विजय मल्‍ल्‍या, आनंद महिंद्रा, वेदांता ग्रूपचे चेअरमन अनिल अग्रवाल, भाजपचे माजी अध्‍यक्ष नितीन गडकरी, मनसे प्रमूख राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री प्रफुल पटेलसह अनेक बडे असामी येथे आले होते.