आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भजी विक्रीपासून केली कमाईची सुरुवात, एका घटनेने बदलले या कामगारचे आयुष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धीरजलाल हीराचंद अंबानी या माणसाने आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय असते, हे स्वतःच्या आयुष्यातून दाखवून दिले आहे. सर्वसामान्य जीवन जगत असतानाही उरात बाळगलेली उत्तूंगतेची स्वप्न त्यांनी स्वकतृत्वावर सत्यात उतरविली. स्वतःच्या ताकदीवर, स्वकतृत्वाने साम्राज्य निर्माण करणा-या मोजक्या लोकांमध्ये दिवंगत धीरुभाई अंबानी यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. भजी तळायच्या कामापासून आयुष्याची सुरुवात करणा-या धीरुभाईंनी एवढे विशाल साम्राज्य उभे केले की, जगाला त्यांची दखल घ्यावी लागली आहे.

कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा इतरांसाठी सर्वोत मोठे उदाहरण होते. कर लो दुनिया मुठ्ठी मे... हे धीरुभाईंनी पाहिलेले स्वप्न होते. अशी अनेक स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी कधीच दिवस-रात्रीचा विचार केला नाही. त्यांच्या याच गुणामुळे इतिहासात त्यांचे नाव आजही जीवंत आहे.

रिलायंन्सला जगात ओळख मिळवून देणारे धीरुभाई अंबानी यांची आज (शनिवार) पुण्यतिथी आहे.