आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुलै-सप्टेंबरमध्ये नोकर्‍याच नोकर्‍या, मायहायरिंगक्लब डॉट कॉमचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील कंपन्या येत्या तीन महिन्यांत नवीन नोकर्‍या देण्याच्या कामाला आणखी गती देण्याची शक्यता असून त्यात विशेष करून माहिती तंत्रज्ञान सक्षम नोकर्‍यांवर जास्त भर असेल, असे एका अहवालात दिसून आले आहे.

येणार्‍या तिमाहीत भारतीय कंपन्या नवीन नोकरभरतीला आणखी गती देण्याची शक्यता असल्याचे मायहायरिंगक्लब डॉट कॉम या संकेतस्थळाने देशातील 5,413 कंपन्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा अंदाज व्यक्त केला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कर्मचारी मनुष्यबळ वाढण्याचा अंदाज या कंपन्यांनी व्यक्त केला आहे. त्यामध्ये कर्मचारी मनुष्यबळ वाढण्याचा अंदाज 74 टक्के कंपन्यांनी, तर चार टक्के कंपन्यांनी ते
घटण्याचा, तर 14 टक्के कंपन्यांनी कोणताही बदल न होण्याची शक्यता व्यक्त केली आहे, परंतु एकूण नवीन नोकर्‍यांचा अंदाज अनुकूल असल्याचे या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.

सर्वच क्षेत्रांत संधी
सर्वच क्षेत्रांतील नोकरीच्या संधींमध्ये सुधारणा झाली आहे. त्यातही आयटी, आयटीईएस आणि बीएफएसआय या क्षेत्रातील नोकर्‍यांना दुसर्‍या तिमाहीत चांगल्या संधी आहेत. त्यामुळे मागील तिमाहीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर तिमाहीत नोकर्‍यांचे प्रमाण वाढण्याचा अंदाज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार यांनी व्यक्त केला.