आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Next Year 11 Percent Increament In Salary, ECA International Report

पुढील वर्षात ११ टक्क्यांनी होणार पगारवाढ, ईसीए इंटरनॅशनलचा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी वर्षात (२०१५) नोकरदारांच्या वेतनात सरासरी १०.९ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. डाटा आणि कॉम्प्युटर सोल्युशन क्षेत्रातील सल्लागार कंपनी ईसीए इंटरनॅशनलच्या अहवालानुसार आशिया खंडातील पाकिस्तान आणि व्हिएतनामनंतर सर्वाधिक वेतनवाढ भारतात होईल. जवळपास ६६ देशांतील ३४० बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारावर ईसीएने हा अहवाल तयार केला आहे.

आशियात ७.२ % वाढ
अहवालानुसार आशियात येत्या वर्षात कर्मचा-यांच्या वेतनात सरासरी ७.२ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. पाकिस्तानात सर्वात जास्त १२ टक्के इन्क्रिमेंटची अपेक्षा आहे. जपान २.३ टक्के वाढीसह सर्वात खालच्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. जगभरात सरासरी ५.८ टक्क्यांनी वेतनवाढीचा अंदाज आहे. चालू वर्षात हे प्रमाण ५.६ टक्के आहे.

सर्वात कमी वाढ युरोपात
सर्वात कमी वेतनवाढ युरोपात होईल. ग्रीस, आयर्लंड, पोर्तुगाल, स्पेन आणि स्वित्झर्लंडमधील कर्मचा-यांना पुढील वर्षात केवळ दोन टक्के इन्क्रिमेंट मिळण्याची शक्यता आहे. युरोपात सरासरी ३.५ टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. चीनमध्ये ८ टक्के वेतनवाढ राहील. महागाई गृहीत धरता तेथे ५.५ टक्क्यांनी वेतनवृद्धी होईल. अमेरिका आणि कॅनडातील कंपन्या आपल्या कर्मचा-यांना ३ टक्के, ऑस्ट्रेलियातील कंपन्या ३.५ टक्के आणि आखातातील कंपन्या ४.७ टक्के इन्क्रिमेंट देतील.

भारतात ३.४ टक्के वाढ
महागाईचा दर गृहीत धरला तर भारतात वास्तवात सरासरी ३.४ टक्क्यांनी वेतनवाढ होईल आणि भारत सातव्या क्रमांकावर राहील. वास्तविक वेतनवाढीत व्हिएतनाम पहिल्या, चीन दुस-या, तर पाकिस्तान तिस-या स्थानी राहील. अर्जेंटिनामध्ये सर्वाधिक २८ टक्के वेतनवाढ होईल.