आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुगलने आणला Nexus 7 टॅब्लेट; पाच एप्रिलपासून भारतात उपलब्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गूगलने Nexus 7 टॅब्लेट भारतीय बाजारात आणला आहे. अनेक फिचर असलेल्या या टॅब्लेटची किंमत 15 हजार 999 रुपये आहे. गुगलच्या प्ले स्टोअर मधून या टॅब्लेटची खरेदी करता येऊ शकते. याची स्टोअरेज क्षमता 16 जीबी आहे. पाच एप्रिलपासून गुगल प्ले स्टोअरवर हा टॅब्लेट विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

गुगल नेक्सस-7 आसुस द्वारा तयार केला गेला आहे. याचा डिस्प्ले 7 इंचाचा असून अँड्राइड 4.1 जेलीबीनवर तो चालतो. याचे रेझुल्यूशन 1280/800 पीक्सल एवढे आहे.

या टॅब्लेटचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या स्क्रिनवर स्क्रॅचेस पडणार नाहीत अशी काच बसविण्यात आली आहे. टॅब्लेटमध्ये कोड कोर प्रोसेसरसह अँड्राइड 4.1 ऑपरेटिंग सीस्टम आहे. 1 जीबी रॅमची त्याला स्पीड असणार आहे. गुगल नेक्सस-7 टॅब्लेटची बॅट्री अँक्टीव्ह असताना 8 तास चालू शकते. याशिवाय, नेक्सस-7 टॅब्लेटमध्ये वाय-फाय, ब्लू टूथ आणि अँड्राइड डाटा ट्रान्सफरची सुविधा आहे.