आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निफ्टीचा पुन्हा उच्चांक, सेन्सेक्स ३५ अंकांनी वधारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निफ्टीचा पुन्हा उच्चांक, सेन्सेक्स ३५ अंकांनी वधारला महागाई आणि औद्योगिक उत्पादनवाढ तसेच व्याज दर कपात या आर्थिक जगतातील कळीच्या आकडेवारीवर नजर ठेवत मंगळवारी शेअर बाजारात व्यवहार झाले. व्याजदरांशी निगडित समभाग, बँकिंग व ऑटो कंपन्यांत्या समभागात खरेदी झाल्याने बाजारात तेजी दिसून आली. त्यामुळे निफ्टीने १८.४० अंकांच्या वाढीसह ८३६२.६५ हा नवा उच्चांक नोंदवला. सेन्सेक्सने ३५.३३ अंकांच्या कमाईसह २७,९१०.०६ ही पातळी गाठली.
रिझर्व्ह बँक नाणेनिधी धोरणाचा आढावा येत्या २ डिसेंबरला घेणार आहे. तसेच महागाई दर आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी व्याजदराशी निगडीत समभागांच्या खरेदीवर भर दिला. त्यामुळे सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी १६ समभाग वधारले. आशियातील प्रमुख शेअर बाजारात तेजी दिसून आली. जपानमधील विक्रीकराची वाढ सरकारने प्रलंबित ठेवल्याने जपानच्या बाजारात मोठी तेजी आली.