आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nifty Cross 10000 Level Soon Invest In Banking Stock

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निफ्टी @ ८०२७; सेन्सेक्सचाही नवा उच्चांक, निफ्टी इतिहासात प्रथमच ८००० अंकांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एप्रिलते जून या तिमाही कालावधीत देशाच्या आर्थिक विकासात चांगली वाढ झाल्याचा बाजाराला मोठा दिलासा मिळाला. परिणामी साैदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्याच िदवशी जाेरदार खरेदी हाेऊन िनफ्टीने इतिहासात पहिल्यांदाच अाठ हजार अंकांची पातळी अाेलांडून नवा िवक्रम नाेंदवला. दुसऱ्या बाजूला सेन्सेक्सही २६,८६७.५५ अंकांच्या अाणखी एका कमाल पातळीवर बंद झाला. खरेदीच्या पाठिंब्यावर सलग सातव्या सत्रातही सेन्सेक्सने अापली चढती कमान कायम राखली.
राष्ट्रीय शेअर बाजारातील िनफ्टीचा िनर्देशांक पहिल्यांदाच अाठ हजारांची पातळी अाेलांडून ८०२७.७० या नव्या िवक्रमी पातळीवर मधल्या सत्रात जाऊन पाेहोचला हाेता. िनफ्टीने अापल्या अगाेदरच्या ७९५४.३५ अंकांच्या िवक्रमी बंद पातळीला मागे टाकत ७३.३५ अंकांनी वाढून ८०२७.७० अंकांच्या अाणखी एका नव्या िवक्रमी पातळीवर बंद झाला. १२ मे ते सप्टेंबर अशा ७८ सत्रांमध्ये िनफ्टीने हजार अंकांपासून ते अाठ हजार अंकांपर्यंतचे अंतर पार केले. मुंबई शेअर बाजाराचा िनर्देशांक २२९.४४ अंकांनी वाढून २६८६७.५५ अंकांच्या कमाल पातळीवर जाऊन बंद झाला. सेन्सेक्सनेही २८ अाॅगस्टचा अगाेदरचा २६,६३८.११ अंकांच्या बंद पातळीचा िवक्रम माेडून काढला.
एप्रिल ते जून या ितमाही कालावधीमध्ये गेल्या अडीच वर्षांत अािर्थक िवकासदरात लक्षणीय सुधारणा हाेऊन ताे ५.७ टक्क्यांवर जाऊन पाेहोचल्यामुळे बाजारातील िवदेशी िनधीचा अाेघ वाढला. परिणामी बाजारात तेजीचे वातावरण हाेते, असे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. जागतिक बाजारातील संिमश्र वातावरण अाणि अन्य आशियाई बाजारातील िस्थर वातावरणामुळेही शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम झाला.