आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nifty Cross 10000 Level Soon Invest In Banking Stocks

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजारावर लक्ष्मी प्रसन्न, सेन्सेक्सने ४० सत्रांत गाठली २६००० ते २७०००ची पातळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कमी झालेली चालू खात्यातील तूट आणि जोडीला आर्थिक विकास दरात झालेली अपेक्षेपेक्षा चांगली वाढ यामुळे खुश झालेल्या विदेशी निधी संस्थांकडून भांडवल बाजारात माेठ्या प्रमाणावर निधीचा ओघ आला. राज्यातील घरोघरी गौरी-लक्ष्मीचे आगमन होत असतानाच बाजारातील खरेदीच्या उत्साहामध्ये सेन्सेक्सने इतिहासात पहिल्यांदाच २७ हजार अंकांची तर िनफ्टीने ८००० अंकांची पातळी अाेलांडली. गुंतवणूकदारांना ऐन गणेशाेत्सवातच महाप्रसाद मिळाला. सेन्सेक्सने २६ हजार ते २७ हजारांचा हा ऐतिहासिक प्रवास ४० सत्रांत पूर्ण केला. िनफ्टीने सोमवारी हजारांची पातळी गाठून तेजीचा मोदक साकारला होता. मंगळवारच्या सत्रात हा मोदक प्रसाद खाऊन नवे चैतन्य लाभलेल्या गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी करत गौरी- लक्ष्मीचे स्वागत २७ हजारी पातळीने केले.
सलग अाठव्या िदवशी उसळी मारताना सेन्सेक्सने सकाळच्या सत्रातच २७,०८२.८५ अंकांची एेितहािसक नवी उंची गाठली. त्यानंतर िदवसअखेर सेन्सेक्स १५१.८४ अंकांनी वाढून २७,०१९.३९ अंकांच्या अातापर्यंतच्या एेितहािसक उंचीवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजारातील िनफ्टीने देखील ८,१०० अंकांची पातळी अाेलांडून मधल्या सत्रात ताे ८,१०१.९५ अंकांच्या कमाल पातळीवर जाऊन पाेहोचला हाेता, परंतु नंतर झालेल्या नफारूपी िवक्रीमुळे काही नफा अाटला अािण िनफ्टीमध्ये ५५.३५ अंकांची वाढ हाेऊन ताे ८०८३,०५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. चालू खात्यातील तूट जीडीपीच्या तुलनेत लक्षणीय कमी हाेऊन ती १.७ टक्क्यांवर अाली असून आर्थिक िवकासदराने देखील एिप्रल ते जून या ितमाही कालावधीत ५.७ टक्के असा गेल्या अडीच वर्षांतील उच्चांक नाेंदवला अाहे. या सकारात्मक घडामाेडींमुळे भांडवल बाजारातील िनधीचा अाेघ वाढला असून त्यामुळे गुंतवणूकदारांना अात्मविश्वास अाणखी दुणावण्यास मदत झाली. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी साेमवारी ५५४.१४ काेटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली अाहे.
सतर्क राहा, नफा पदरात घ्या
^आताशेअर बाजारात सर्वत्र चांगले वातावरण आहे. गुंतवणूकदारांनी अशा वेळी जास्त सतर्क असणे आवश्यक आहे. समजा आपल्याकडे १० शेअर्स असतील. त्यातील नफ्यात असतील तोट्यात असतील, तर तोट्यातील शेअर्स आधी िवका, नफा वाढू द्या. प्रत्येक उसळीवर िवक्री घसरणीत खरेदी हे सूत्र कायम लक्षात ठेवा. -िवश्वनाथ बोदाडे, शेअरमार्केट तज्ज्ञ.

जपान भेटीने चालना
पंतप्रधाननरेंद्र माेदी यांची जपानची भेट फलदायी ठरली अाहे. जपानने अापल्या गुंतवणुकीत दुपटीने वाढ करून पुढील पाच वर्षांत ३४ अब्ज डाॅलरची खासगी अािण सार्वजनिक गुंतवणूक करण्याची घाेषणा साेमवारी केली. यामुळेदेखील बाजाराच्या उत्साहात अाणखी भर पडली.
सेन्सेक्सने जबरदस्त कामगिरी करत २७ हजारांची पातळी पार केली. शेअर बाजारातील ३०० हून जास्त समभागांनी मंगळवारी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. एसीसी, भारती एअरटेल, िसप्ला, डॅा. रेड्डीज लॅब, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प, आयओसी, लुपिन, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती-सुझुकी, टेक महिंद्रा आदी ब्ल्यू चिप कंपन्यांनी वार्षिक उच्चांकाची नोंद केली.