आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nifty Crossed 7300 Levels, Bookprofits At These Levels

बाजार उत्सुक: मोदी सरकारच्या निर्णय-निकालांवर राहणार नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन कारणांमुळे हा आठवडा बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. एक, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दुसरे, एक हजारापेक्षा जास्त छोट्या-मोठ्या कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहेत. जाणकारांच्या मते मोदी फॅक्टरने बाजारावर आतापर्यंत चांगली छाप पाडली आहे. त्यामुळे आता जास्त परिणाम होणार नाही, मात्र कंपन्यांच्या आर्थिक निकालांबाबत उत्सुकता आहेच. यात टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, गेल, ओएनजीसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांचा समावेश आहे.
आता निर्णयाची प्रतीक्षा
०सुधारणा कार्यक्रमावर मोदी सरकार काय पावले उचलणार आणि प्रलंबित योजनांबाबत काय निर्णय घेणार यावर गुंतवणूकदार गुंतवणुकीचा निर्णय घेतील
० येत्या तीन जून रोजी रिझर्व्ह बँक पतधोरणाचा आढावा घेणार आहे. या काळात व्याजदरांशी संवेदनशील असणार्‍या समभागांवर परिणाम दिसून येईल
० छोट्या आणि मध्यम कंपन्यांच्या आर्थिक निकालांवर आता गुंतवणूकदारांची नजर आहे. चांगले निकाल असणार्‍या कंपन्यांच्या समभागांत गुंतवणूक होण्याची शक्यता.