आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पपरिचय: डॉ. नीळकंठराव कल्याणी, सामाजिक भान जपणारा द्रष्टा उद्योजक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भारत फोर्ज कंपनीची स्थापना नीळकंठराव कल्याणी यांनी पुण्यात 1961 मध्ये केली. झपाटलेला उद्योजक असे त्यांचे वर्णन केले जाते. केवळ कल्याणी समूहच नव्हे तर अनेक संस्था, उद्योग, संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. महाराष्ट्र सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्षपद त्यांनी 12 वर्षे भूषवले. कायनेटिक उद्योग, फिनोलेक्स, सुदर्शन केमिकल्स आदी उद्योगांच्या भरभराटीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे ते संचालक होते. कर्नाटक विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या नीळकंठराव यांनी विज्ञान विषयात पीएचडी. मिळवली होती. शेतकरी आणि उद्योजक यांच्या मदतीला धावणारा एक द्रष्टा उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती.


आधार हरपला
मराठी माणसांची अस्मिता जागृत करणारे नेतृत्व हरपले. उद्योगजगताची व महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. भारत फोर्ज व कल्याणी समूहाच्या माध्यमांतून त्यांनी सातत्याने अनेक लघुउद्योजकांना उभारी देण्याचे कार्य केले. उद्योगजगत सदैव त्यांचे ऋणी राहील .
मुकुंद कुलकर्णी, उद्योजक, औरंगाबाद

उद्योगासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व
यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत ज्या वेळेस राज्याच्या औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली त्या वेळी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे नीळकंठ कल्याणी. राज्य पुनर्रचनेनंतर गुजरातकडे उद्योजक जात असताना कल्याणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. उल्हास गवळी, उद्योजक

भारत फोर्जचा पायोनियर आणि मोठा उद्योजक राज्याने गमावला आहे. उद्योगजगताचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यामुळे मसिआ तसेच उद्योजकांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली. उदय गिरिधारी, उद्योजक