आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nissan Automobile Company News In Marathi, Divya Marathi,datsun Go

अल्टो, इऑनला टक्कर देणार निस्सानची डॅटसन गो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मारुती सुझुकीच्या सर्वाधिक खपाच्या अल्टो मोटारीला टक्कर देण्यासाठी डॅटसन या जपानच्या कंपनीने आता ‘डॅटसन गो’ ही नवी छोटेखानी मोटार बाजारात दाखल केली आहे. एका लिटरमध्ये 20.63 किलोमीटर अंतर कापणा-या या मोटारीची किंमतही ग्राहकांना परवडेल अशी ठेवण्यात आली आहे, हे विशेष.


‘डॅटसन गो’ केवळ अल्टोच नाही तर अल्टो के 10 आणि ह्युंदाई इऑन मोटारीचाही समावेश आहे. डॅटसन ब्रॅँड अंतर्गत या प्रवेश पातळीवरील मोटारीचे लक्ष्य प्रामुख्याने पहिल्यांदा मोटार खरेदी करणारा ग्राहक असेल. कारण जवळपास तीन दशकांनी डॅटसन ब्रॅँडचा फेरआढावा घेण्यात आला असून त्यासाठी निसान कंपनीची मदत घेण्यात आली आहे.
निस्सान ब्रॅँडच्या मदतीने आम्ही जे करू शकलो नाही ते डॅटसनच्या माध्यमातून करत आहोत. भारतीय वाहन बाजारपेठ अतिशय स्पर्धात्मक आहे, परंतु तरीही निसानच्या भारतातील एकूण विक्रीत डॅटसन ब्रँडचा वाटा एक तृतीयांश असेल असा विश्वास निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केनिचिरो योमुरा यांनी व्यक्त केला.


यामुळेच जवळपास 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच ही मोटार कमी किंमत असलेल्या मोटारींच्या स्पर्धेत प्रवेश करीत आहे. डॅटसन ब्रॅँडअंतर्गत 2016 पर्यंत कंपनी आणखी तीन मोटारी बाजारात आणण्याचा विचार करीत आहे.